‘ईस्टर’ सणानिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रार्थना, मिरवणूक व इतर कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:24 PM2019-04-21T23:24:26+5:302019-04-21T23:26:29+5:30
‘गुड फ्रायडे’च्या बलिदानानंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण ‘ईस्टर’रविवारी भक्तिभावे, प्रार्थना आणि धर्मोपदेशासह पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी पवित्र शास्त्राआधारे सणाचे धार्मिक महत्त्व विशद केले. गायकवृंदांनी प्रसंगानुरूप गीते सादर करून वातावरण निर्मिती केली.
औरंगाबाद : ‘गुड फ्रायडे’च्या बलिदानानंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण ‘ईस्टर’रविवारी भक्तिभावे, प्रार्थना आणि धर्मोपदेशासह पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी पवित्र शास्त्राआधारे सणाचे धार्मिक महत्त्व विशद केले. गायकवृंदांनी प्रसंगानुरूप गीते सादर करून वातावरण निर्मिती केली.
रविवारी पहाटे शहराच्या विविध परिसरातून पुनरुत्थानाची भजने गात, विविध वाद्य व ढोल-ताशांसह मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना भाविकांनी पाणी, चहा, फराळ, पोहे, बिस्किटे आणि आइस्क्रीम वाटप केले. सायंकाळी सर्वपंथीय ख्रिश्चन बांधवांतर्फे सलग १४ व्या वर्षी शहरातून ‘शांतता रॅली’ काढून सर्वधर्म समभाव आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
छावणीतील क्राईस्ट चर्च, सेंट फि लिप चर्च, होली ट्रिनीटी चर्च, सेंट स्टिफन चर्च- सिडको, सेंट पॉल चर्च- बाजार वाहेगाव, संत आंद्रिया चर्च-सायगाव, क्राईस्ट चर्च- बदनापूर , सेंट लेनार्ड चर्च- पाचोड, हर्षी आणि डोणगाव, क्राईस्ट चर्च-वाळूज, सियोन चर्च- बजाजनगर, इम्यान्युएल चर्च मिनिस्ट्रीज-लांझी, चर्च आॅफ दी नॅझरीन (सिटी)- ज्युबिली पार्क, चर्च आॅफ दी नॅझरीन -सिडको , हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च- काचीवाडा, ए. जी. चर्च- मसनतपूर , फ्रेड प्रेअर हॉल- उस्मानपुरा, एनटीपीएच शारोन चर्च- भावसिंगपुरा, सियोन चर्च- शताब्दीनगर, न्यू लाईफ फेलोशिप चर्च, ईसीआय चर्च- मुकुंदवाडी, शारोन प्रार्थना हॉल- भावसिंगपुरा, आराधना फेलोशिप चर्च, सेंट जॉन चर्च, सीएफसी चर्च, नवजीवन धारा चर्च, डेक्कन ख्रिश्चन सेंटर, ब्रदरेन चर्च, सिलोह चर्च- बजाजनगर, बॅप्टिस्ट चर्च, सेव्हन्थडे अॅडव्हेन्टिस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च-छावणी, जालना रोड, सिडको आणि वाळूज, नवप्रेषितीय मंडळी-तुर्काबाद खराडी, सीफेम होली चर्च-उस्मानपुरा, खावडा आणि तीसगाव, स्वर्णा फेलोशिप चर्च- नारेगाव, ब्रदरहूड चर्च- समतानगर आदी चर्चमध्ये वरीलप्रमाणे ईस्टर सण साजरा करण्यात आला.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना वाघमारे आणि घाडगे परिवारातर्फे चहा आणि खिचडी वाटप करण्यात आली. निकाळजे यांनी आइस्क्रीम, बंटी उमाप यांनी चहा आणि पोहे, ज्युएल अर्नाजलम आणि संतोष पाटोळे यांनी बिस्किटे आणि झिम्बाब्वे गँगतर्फे पोहे वाटप करण्यात आले. चर्चसमोरील विविध स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा सर्वांनी लाभ घेतला.
------------