पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:09 AM2021-02-20T04:09:27+5:302021-02-20T04:09:27+5:30

औरंगाबाद : जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळाच्यावतीने नागेश्वर मंदिर,नागेश्वरवाडी येथे शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा ...

Traditional Shivjanmotsav ceremony | पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा

पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळाच्यावतीने नागेश्वर मंदिर,नागेश्वरवाडी येथे शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मंगल आबा काळे यांच्या हस्ते उपस्थितांना साखर पान व घुगऱ्या वाटण्यात आल्या. कार्यक्रमात प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. अलिकडेच एका अपघातात गुरव समाजातील नेरुळ येथील झुंजारे कुटुंबियांमधील चारजण दगावले होते. त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री काळे, रोहिणी शेवाळे, सुवर्णा मुंगीकर, मीना साळुंके, कांता बचाटे, रामनाथ कापसे, पुंडलिक सोनवणे, विष्णू बचाटे, रवी साळुंके, नीलेश बचाटे, कडूबाळ कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Traditional Shivjanmotsav ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.