जालन्यामध्ये आज ओबीसी एल्गार सभा; धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूकीत बदल

By सुमित डोळे | Published: November 17, 2023 11:44 AM2023-11-17T11:44:06+5:302023-11-17T11:45:56+5:30

ओबीसी एल्गार सभा, सोलापुर-धुळे महामार्गावरील जड वाहतूकीत बदल

Traffic changes on Solapur-Dhule highway due to OBC Elgar Sabha | जालन्यामध्ये आज ओबीसी एल्गार सभा; धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूकीत बदल

जालन्यामध्ये आज ओबीसी एल्गार सभा; धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूकीत बदल

छत्रपती संभाजीनगर :अंबडच्या धाईतनगरमध्ये शंभर एकर मैदानावर आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने धुळे - सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

एल्गार सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, रासप अध्यक्ष महादेव जानकर, शब्बीर अन्सारी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातून याला जवळपास ५ ते ६ लाख ओबीसी समाज बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेचे ठिकाणी सोलापुर धुळे महामार्गावर असल्याने पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी गुरूवारी रात्री १० ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

यात अंबडकडे जाणारी जड वाहने छत्रपती संभाजीनगर, पाचोड, शहागड, बीड कडे जातील व येतील. तर पाचोड, जामखेड फाटाकडून अंबड कडे जाणारी जड वाहने जालना रस्ता, बदनापुर, जालना मार्गे अंबडकडे जातील.

वाहन पार्किंगसाठी पाच ठिकाणी व्यवस्था
सभेला अनेकजण खासगी वाहने करून येणार आहेत. ही वाहने पार्किंग करण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यात पाचोड रोड वर राम लांडे यांचे शेत, भालचंद्र रेसिडेन्सी, ओम शांती विद्यालय, दत्ताजी भाले विदयालय तसेच जालना मार्गावर फेडरेशन मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. घनसावंगी रोड ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
या सभेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १२०० पोलिस कर्मचारी अधिकारी, २०० अधिकारी, कर्मचारी इतर जिल्ह्यातील राहणार आहेत. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, रॅपीड ॲक्शन फोर्सचीएक कंपनी, क्विक ॲक्शन टीम, ९ स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्ताचे काम पाहणार आहे.

Web Title: Traffic changes on Solapur-Dhule highway due to OBC Elgar Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.