औरंगाबाद-जळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:41 AM2017-11-12T00:41:52+5:302017-11-12T00:41:56+5:30

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फरशी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाड तोडणा-यांकडून वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.

 Traffic jam on Aurangabad-Jalgaon highway | औरंगाबाद-जळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फरशी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाड तोडणा-यांकडून वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.
राज्य मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु सदर यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. फरशी फाट्याजवळ एक वडाचे झाड तोडल्यावर सदर झाडाच्या फांद्या चक्क रोडवर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने जवळपास एक कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता जाम झाल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले व पोलीस उपअधीक्षक नयना आलूरकर यांनी पथकासह तात्काळ धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. जवळपास अर्धा तास वाहतूक सुरळीत करण्यात गेला.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी अशोक आम्ले यांनी सदर झाडे तोडणा-या यंत्रणेची चांगलीच कानउघडणी केली. शिवाय एखाद्या ठिकाणचे झाड रोडवर पडून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल, अशी परिस्थिती असल्यास झाड तोडण्याआधी पोलिसांना कल्पना देण्याची त्यांना समज दिली.

Web Title:  Traffic jam on Aurangabad-Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.