वाहतूक कोंडी सुटणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:55 AM2017-09-15T00:55:19+5:302017-09-15T00:55:19+5:30
वळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गाडी या पूलावरुन धावून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी दिली.
बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मिनी बायपास आणि शहरातून वाहतूक वळविल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: जड वाहतूक वाहनांमुळे रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातून जाणाºया धुळे-सोलापूर या राष्टÑीय महामार्गावर वळण रस्त्याचे काम पूर्ण युद्धपातळीवर पूर्ण करुन ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
१४ सप्टेंबर रोजी विनायक मेटे यांनी या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, आयआरबीचे रवींद्र चौरे, जि.प. सदस्य अशोक लोढा, दत्ता गायकवाड, अॅड. राहुल मस्के, सुहास पाटील, सुशांत सत्राळकर, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
हा वळण रस्ता साडेबारा कि.मी. अंतराचा असून, यापैकी फक्त दीड कि.मी.चे काम बाकी आहे. पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर छोटे-मोठे सहा पूल असून, ते काम पूर्ण झाले आहे. एडशी ते औरंगाबाद असे १९० कि.मी.चा रस्ता काम चालू असून, हा मार्ग पूर्ण करण्याचे काम कंपनीतर्फे युद्धपातळीवर चालू आहे. ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी ३० महिन्याच्या आतच हा मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत. या वळण रस्त्याची एकेरी वाहतूक काम पूर्ण करुन सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी कंपनीच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. विनायक मेटे म्हणाले, मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या कामास वेग आला आहे.
या रस्त्याची पाहणी केल्यानंतर मेटे यांनी वाहून गेलेल्या पर्यायी पूलासही भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सध्या पावसामुळे बिंदूसरा नदीस पूर येत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.