डीएमआयसीतील रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा भुलभुलय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:02 AM2021-05-25T04:02:56+5:302021-05-25T04:02:56+5:30

लाडसावंगी : करमाड रस्त्यालगत शेंद्रा डीएमआयसीचे विस्तारीकरणासाठी जागोजागी डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना सतत मार्ग बदलावा लागत आहे. त्यामुळे ...

Traffic jams due to road works at DMIC | डीएमआयसीतील रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा भुलभुलय्या

डीएमआयसीतील रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा भुलभुलय्या

googlenewsNext

लाडसावंगी : करमाड रस्त्यालगत शेंद्रा डीएमआयसीचे विस्तारीकरणासाठी जागोजागी डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना सतत मार्ग बदलावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक रस्त्यांचा मार्ग शोधत भुलभुलैया मार्गाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कोठेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे कोणत्या रस्त्याने जावे, असा गहण प्रश्न वाहनधारकांमध्ये निर्माण झाला आहे.

लाडसावंगी परिसरातून दररोज शेकडो वाहने करमाड, औरंगाबाद, पैठणकडे ये-जा करत असतात; परंतु करमाड व भांबुर्डा या दोन्ही गावाच्यामध्ये शेंद्रा डीएमआयसीसाठी रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. यात दररोज जागोजागी रस्ता बंद करण्यात येतो. रस्त्यावर मोठमोठाले पाइप टाकून रस्ता बंद केला जातो. लाडसावंगी परिसरातील नागरिकांना करमाड, पैठण, औरंगाबादकडे जाण्यासाठी डीएमआयसीतील वाहनांचा प्रवास करावा लागतो.

चौकट

वाहनधारकांच्या नशिबी मनस्ताप

ज्या रस्त्यावरून सकाळी करमाडकडे गेल्यावर तोच रस्ता परत येताना वाहतुकीसाठी बंद झालेला असतो. यात करमाड, पैठण व औरंगाबादकडे जाणारे दिशा फलक नसल्याने वाहनधारकांना डीएमआयसीतील भुलभुलैया रस्त्यांवर अर्धा तास घातल्यानंतर आठ ते दहा किलोमीटर फिरून मग मुख्य रस्त्याचा पत्ता लागतो. यात पेट्रोल, डिझेल विनाकारण खर्च होत आहे. केवळ दिशा फलक नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोट

मला दररोज औरंगाबाद शहरात कामासाठी जावे लागते. सकाळी रस्ता वाहतुकीसाठी खुला राहतो. तर परत येताना तोच रस्ता बंद झालेला आहे. चारपाच किलोमीटर फिरून लाडसावंगी गावाचा रस्ता सापडतो. यात कामावर जाताना व येताना दररोज उशीर होतो. दिशादर्शक फलक व काम चालू असल्याचे फलक लावले गेले नाही. - राजू लष्कर, लाडसावंगी.

240521\1621846382567_1.jpg

डिएमआयसीतील अनेक रस्ते अशाप्रकारे वाहतुकीसाठी बंद केले जात असल्याने वाहनधाकर त्रस्त झाले आहेत.

Web Title: Traffic jams due to road works at DMIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.