रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:58 PM2019-03-22T21:58:04+5:302019-03-22T21:59:06+5:30

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली.

Traffic obstructing encroach was deleted | रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली

रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली

googlenewsNext

वाळूज महानगर : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली.


औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर, वाळूज या ठिकाणी हातगाडी, टपरीचालक आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. खरेदीसाठी येणारे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे, तसेच अपघाताच्या घटना घडत आहेत. वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी पथकासह शुक्रवारी सायंकाळी पंढरपुरात अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी भाजीपाला, मांस व मच्छी विक्रेते, तसेच इतर व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.

Web Title: Traffic obstructing encroach was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज