सुसाट वाहनांना वाहतूक पोलिसांचा लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:12 PM2019-12-01T21:12:22+5:302019-12-01T21:12:30+5:30
सुसाट पळणाºया वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ‘इंटर सेप्टर’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले.
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर रोडवर शनिवारी झालेल्या गंभीर अपघातानंतर दक्षता घेत रविवारी पहाटेपासून सुसाट पळणाºया वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ‘इंटर सेप्टर’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून ई-चलन वसुली करण्यात आली, ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’, काळ्या काचा, वेगवर हे यंत्र लक्ष ठेवून आहे. गाडीला थांबवून कर्मचारी विचारपूस करीत होते. चालक दारू पिवून बेदरकार गाडी चालवित होता काय याची खातजमा करण्याठी ब्रिथ अॅनालायझरने त्याची चाचणी केली जात होती. त्या नियमानुसार त्याला ई-चलन पावती दिल्या जात होत्या.
औरंगाबाद- नगर मुख्यरस्त्याला वाहनांची वर्दळ असून, अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने इंटर सेप्टर यंत्रासह वाहने दिले आहेत. यामुळे पोलीस कर्मचाºयासोबत वाद घालण्याचा प्रसंगच येणार नाही. चूक मान्य करून ई-चलन पावती स्वीकारने वाहनचालकाला भाग पडत असल्याचे दिसून आले.
अपघात रोखण्यासाठी प्रयत्न हवे
वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-यांनी रस्त्यावर विना हेल्मेट आणि नियम तोडणाºयांना रविवारी चांगलेच धारेवर धरले. सकाळपासून नगररोडवर मोहीम सुरू होती. कारखान्यात जाणाºया कामगारांची वाहतूक करणारी वाहने, दुचाकीस्वारांना शिस्तीत चालण्यास भाग पाडले. परंतु ही मोहीम दररोज रस्त्यावर राबविल्यास अपघात रोखण्यास मदत होणार आहे.