्र्रपोलिसांच्या छापासत्राने वसमतमध्ये हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:56 PM2017-09-07T23:56:28+5:302017-09-07T23:56:28+5:30

शहर पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधात छापा सत्र सुरूच ठेवल्याने अवैध व्यवसायिक पार हादरले आहेत. शहरातील अवैध दारु, जुगार, मटका, धान्य तस्करी, रॉकेल तस्करी, गुटखा विरोधात एकापाठोपाठ एक सलग कारवाया होत असल्याने वसमत शहर अवैध व्यवसायमुक्त करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अवतरलेली दिसत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सामान्य नागरिकांनाही हिम्मत आल्याचे चित्र आहे.

The tragedy of the protesters | ्र्रपोलिसांच्या छापासत्राने वसमतमध्ये हादरा

्र्रपोलिसांच्या छापासत्राने वसमतमध्ये हादरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहर पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधात छापा सत्र सुरूच ठेवल्याने अवैध व्यवसायिक पार हादरले आहेत. शहरातील अवैध दारु, जुगार, मटका, धान्य तस्करी, रॉकेल तस्करी, गुटखा विरोधात एकापाठोपाठ एक सलग कारवाया होत असल्याने वसमत शहर अवैध व्यवसायमुक्त करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अवतरलेली दिसत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सामान्य नागरिकांनाही हिम्मत आल्याचे चित्र आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्याचा प्रभार तीन महिन्यांपूर्वी उदयसिंह चंदेल यांनी स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत वसमत पोलिस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय व गुंडगिरीला थारा देणार नाही, अशी घोषणा केली होती. पदभार स्वीकारताना बहुतेक वेळी अशाच घोषणा होतात मात्र त्यानंतर चित्र उलटे असते. असा आजवरचा अनुभव होता. मात्र या वेळेचे चित्रच उलट दिसत आहे.
पोलीस निरीक्षक चंदेल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यात हिम्मत वाढवण्याचे काम केले. त्याचा परिणाम असा झाला की, आज पोलीस काँस्टेबलचाही आत्मविश्वास वाढून कामगिरी सुधारली आहे. वसमत शहरात अवैध दारु विक्री ही सर्वात मोठी समस्या होती. राष्टÑीय महामार्गावरही खानावळीच्या नावाखाली ‘पिनावळी’ सुरू होत्या अवैध दारु विक्रीविरोधात सर्वाधीक गुन्हे दाखल झाले. पार्सल दारु तर वसमत शहरातून जिल्हाभरात नांदेड जिल्ह्यातही जात असते. पार्सल पाठवणारांच्या टोळ्याच आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली. दुचाकीसह दारुचा साठा जप्त करण्याचा सपाटा लागल्याने पार्सलदारु वसमतमधून जाणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे दारु विक्रेते व पार्सल टोळ्या हादरल्या आहेत.
धान्य तस्करीसाठी वसमत तालुका मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. वसमत शहरात रेशनच्या धान्याची खरेदी करून माळवटा, कुरूंदा मार्गे नांदेड, हैदराबादकडे राशन पाठवणाºया अनेक टोळ्या शहर व तालुक्यात आहेत.
वसमत शहरात धान्य तस्करीवर झालेल्या कारवायांनी धान्य तस्करही हादरले आहेत.

Web Title: The tragedy of the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.