वाळूज महानगरात अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:57+5:302021-09-24T04:04:57+5:30

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात अन्न औषधी प्रशासन आणि ‘फॉसटॅक’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हॉटेलचालक व अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या ...

Training of food professionals in Waluj metropolis | वाळूज महानगरात अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण

वाळूज महानगरात अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात अन्न औषधी प्रशासन आणि ‘फॉसटॅक’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हॉटेलचालक व अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन जनजागृती करण्यात आली.

भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने अन्न औषधी प्रशासन व ‘फॉसटॅक’च्या संयुक्त विद्यमाने २६ ऑगस्टपासून अन्नपदार्थांची विक्री करणारे तसेच हॉटेलचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. खाद्यपदार्थ व वस्तूंमधील भेसळ कशी ओळखावी तसेच मुदतबाह्य वस्तूंची विक्री करु नये, यासाठी बजाजनगर, पंढरपूर, वडगाव, वाळूज, अंबेलोहळ, तुर्काबाद, लिंबेजळगाव आदी ठिकाणच्या व्यापारी, दुकानदार, हॉटेलचालक यांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘फॉसटॅक’चे जिल्हा समन्यवय दीपक पवार व त्यांचे सहकारी जनजागृती करीत आहेत. ‘फॉसटॅक’ या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहेत. या प्रशिक्षणात वाळूज महानगर परिसरातील विक्रेते व हॉटेलचालक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत आहेत, असे दीपक पवार यांनी सांगितले.

----------------

Web Title: Training of food professionals in Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.