वैजापुरात फेरीवाल्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:06 AM2021-01-21T04:06:21+5:302021-01-21T04:06:21+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँकेच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या फुले आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ...
स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँकेच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या फुले आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहाराचे क्युआर कोड वाटप करण्यात आले. फेरीवाल्यांच्या खात्यात क्युआर कोड स्कॅनिंग करून एक रुपया वर्ग करण्यात आला. कर्ज वितरित झालेल्या लाभार्थ्यांनी मै भी डिजिटल या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त डिजिटल आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले. उपमुख्याधिकारी साठे व बँकेचे अधिकारी भालेराव, नरवडे यांनी डिजिटल व्यवहाराची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत यांनी केले.
फोटो कॅप्शन : वैजापूर शहरातील फेरिवाल्यांना क्युआर कोड वाटप करताना नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत बिघोत.