निवडणुकीबाबत सिल्लोडमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:04 AM2021-01-03T04:04:41+5:302021-01-03T04:04:41+5:30

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण सिल्लोड : आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा ...

Training of staff in Sillod on elections | निवडणुकीबाबत सिल्लोडमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

निवडणुकीबाबत सिल्लोडमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

googlenewsNext

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

सिल्लोड : आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. सिल्लोड तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी प्रशिक्षण दिले.

परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले.

पहिल्या प्रशिक्षण वर्गाला विनापरवानगी गैरहजर असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. याप्रसंगी नायब तहसीलदार सोनवणे, विनोद करमनकर, किरण कुलकर्णी, तालुकास्तरीय विविध अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबविताना ईव्हीएम मशीन समाविष्ट करण्यात आल्या असून, या मशीनसंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारे मशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली.

- कॅप्शन : सिल्लोडमध्ये निवडणूक प्रशिक्षणाला उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी.

Web Title: Training of staff in Sillod on elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.