रेल्वे रुळात फट पडल्याने थांबविल्या होत्या गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:24 AM2017-08-22T00:24:54+5:302017-08-22T00:24:54+5:30
रविवारी देवगिरी एक्सप्रेसह अन्य इतर दोन गाड्यांना झालेला विलंब हा सिग्नलमधील बिघाड नसून रेल्वे रुळामध्ये पडलेल्या फटीमुळे या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर थांबविल्या असल्याची माहिती समोर आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रविवारी देवगिरी एक्सप्रेसह अन्य इतर दोन गाड्यांना झालेला विलंब हा सिग्नलमधील बिघाड नसून रेल्वे रुळामध्ये पडलेल्या फटीमुळे या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर थांबविल्या असल्याची माहिती समोर आली आहे़
२० आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेस तब्बल दीड तास स्थानकाबाहेर उभी करण्यात आली होती़ पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले़ परंतु, हा प्रकार वेगळा असल्याची माहिती सोमवारी समोर आली आहे़ परळीकडे जाणाºया रेल्वे मार्गावर रेल्वे रुळात फट पडल्याने या मार्गावरून धावणाºया दोन एक्सप्रेस गाड्यांसह एका पॅसेंजर गाडीला विलंब लागला होता़ २० आॅगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला़ परभणी- परळी मार्गावरील किमी क्रमांक ३२९ जवळ (साखला प्लॉट भाग) रेल्वे रुळामध्ये फट पडल्याची माहिती एका शेतकºयाने रेल्वेच्या अधिकाºयांना दिली़ ही माहिती मिळताच संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ रेल्वे रुळामधील फट ही मोठ्या स्वरुपातील असल्याने रुळाचा संपूर्ण तुकडा बदलण्यात आला़ या प्रक्रियेमुळे परळीहून शिर्डीकडे जाणारी काकीनाडा एक्सप्रेस, परभणीहून परळीकडे जाणारी एक्सप्रेस आणि पंढरपूर पॅसेंजर गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावल्या़ तसेच देवगिरी एक्सप्रेस ही गाडीही दीड तास उशिराने धावली़ देवगिरी एक्सप्रेस ही गाडी तर परभणी स्थानकाबाहेरच उभी करण्यात आली होती़ दरम्यान, थंडी पडल्याने रेल्वे रुळामध्ये फट पडणे ही बाब फारशी गंभीर नसल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांकडून सांगितली जात आहे़ उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अधिकाºयांनी गांभीर्याने घेवून हा बिघाड दुरुस्त केला़