मराठवाड्यातील दुष्काळावर ‘वॉटर ग्रीड’चा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 06:54 AM2019-06-11T06:54:22+5:302019-06-11T06:54:57+5:30

निवडणुकीपूर्वी भूमिपूजन : इस्रायल तंत्रज्ञानाद्वारे १० हजार ५९५ कोटींचा खर्च

Transcript of water grid on drought of Marathwada | मराठवाड्यातील दुष्काळावर ‘वॉटर ग्रीड’चा उतारा

मराठवाड्यातील दुष्काळावर ‘वॉटर ग्रीड’चा उतारा

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी या भागातील ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडली जाणार आहेत. इस्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पूर्ण केले असून तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात येणार आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या ‘वॉटर ग्रीड’ अंतर्गत जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णूपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मन्याड, इसापूर, पेनगंगा ही ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडली जाणार आहेत. सहा महिन्यांत आठही जिल्ह्यांतील काम सुरू होणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, असे लोणीकर यांनी सांगितले.
जलवाहिनीतून कारही जाईल
ग्रीडमधील वापरण्यात येणाºया जलवाहिनीचा व्यास हा इनोव्हासारखी कार जाईल एवढा मोठा असेल.

काय आहे वॉटर ग्रीड?
1330
कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी

11
धरणे एकमेकांशी जोडली जाणार

प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी

3220
कि.मी. जलवाहिनी

पहिला टप्पा; तरतूद
10595
कोटी रुपये

2050
पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज
भागणार कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी

Web Title: Transcript of water grid on drought of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.