'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:44 PM2024-07-30T12:44:54+5:302024-07-30T12:45:38+5:30

एक महिन्यापासून या बदल्यांची फाइल फिरत होती. शेवटी प्रशासनाने निर्णय घेतला.

Transfer of 'undesirable' officials to municipalities; Appointed employees at the 'Malaidar' table | 'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी

'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही विभागांत नकोसे असलेल्या अधिकाऱ्यांची थेट उचलबांगडी करण्यात आली. मर्जीतील अधिकाऱ्यांची ‘मलईदार’ टेबलवर वर्णी लावण्यात आली. एक महिन्यापासून या बदल्यांची फाइल फिरत होती. शेवटी प्रशासनाने निर्णय घेतला. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.

शुक्रवारच्या तारखेत काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशांत दक्षता विभागाचे उपअभियंता गोविंद 
पाटे यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे दक्षता कक्ष, कत्तलखान्यासह इतर विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे यांची प्रभाग आठमध्ये बदली केली. कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांची प्रभाग सातमध्ये उपअभियंता म्हणून, अभियांत्रिकी सहायक बळीराम बोंबले यांची नगर रचना विभागातून मालमत्ता विभागात बदली केली. उपअभियंता देवेंद्र टेंगळे यांची प्रकल्प विभागातून बीओटी विभागात, सहायक अभियंता आरती नवगिरे यांची घरकुल आवास योजनेतून घरकुल विभागात प्रभारी उपअभियंता म्हणून, कंत्राटी अभियंता गंगाधर भांगे यांच्याकडे गुंठेवारीसाठी प्रभाग १ ते १० प्रभागांची माेठी जबाबदारी सोपविली. कनिष्ठ अभियंता किरण तमनर यांची पाणीपुरवठा विभागातून प्रभाग नऊमध्ये उपअभियंता म्हणून, कनिष्ठ अभियंता रामेश्वर सुरासे यांची अतिक्रमण हटाव विभागातून नगररचना विभागात, सोमशंकर म्हेत्रे यांची प्रभाग दोनमधून पाणीपुरवठा विभागात, अतिष पाटील यांची उद्यान विभागात बदली केली.

ठोकळ यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी
सातारा-देवळाई येथील वादग्रस्त कार्यालय प्रकरणातील वरिष्ठ लिपिक कृष्णा ठोकळ यांच्याकडे पूर्वी आठ व दहा या प्रभागांची जबाबदारी होती. आता ७ व ८ ची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता काझी जावेद अहमद यांची ड्रेनेज विभागातून प्रभाग १, २ मध्ये, लिपिक शेख असिफ यांची प्रभाग ३, ४, कनिष्ठ अभियंता भरत देवकर यांची प्रभाग ५,६, अनुरेखक विनोद पवार यांची प्रभाग १० मध्ये बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of 'undesirable' officials to municipalities; Appointed employees at the 'Malaidar' table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.