एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:02 AM2021-07-10T04:02:02+5:302021-07-10T04:02:02+5:30
साहेबराव हिवराळे औरंगाबाद : आता सर्वच जिल्ह्यात एसटीबसेस सुरू झाल्या आहेत. परराज्यात बससेवाही सुरू झाली आहे. कोरोनाची भीती खबरदारीने ...
साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : आता सर्वच जिल्ह्यात एसटीबसेस सुरू झाल्या आहेत. परराज्यात बससेवाही सुरू झाली आहे. कोरोनाची भीती खबरदारीने कमी झाली असली तरी एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच ! अशी अवस्था निर्माण झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण आगार-८ असून,
एकूण बसेस -५५० बसेस आहेत.
सध्या सुरू असलेल्या बसेस -४५० सुरू असून, आवश्यकतेनुसार बसेस सोडण्यात येत आहे. निर्बंध घातल्यामुळे प्रत्येक जण स्वतःची काळजी घ्यावी यादृष्टीने वावरत आहे. अनेक ठिकाणी निर्बंधाला केराची टोपली दाखवली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना पॅसेंजर मिळत नाही. ग्रामीण भागातील १०० च्या जवळपास गाड्या बंद असून, प्रवाशांना बोलविण्यासाठी चालक व वाहक यांना आवाज द्यावा लागतो आहे.
रोज एकूण फेऱ्या-९००
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस-१००
- पुन्हा तोटा वाढला...
राज्यात निर्बंध लावल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या सोडून प्रवाशांचा उत्साह कमी दिसतो. परिणामी एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट...
-तिसऱ्या लाटेच्या सावट असल्यामुळे प्रवासी घराच्या बाहेर निघाला तयार नाहीत. जोखीम घेऊन कामानिमित्त कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना भीती वाटत आहे. दुसऱ्या राज्यातील बससेवेला प्रवासी मिळेनात. तेवढं परराज्यांत जाणाऱ्या बसला प्रतिसाद मिळत आहे.
लोकलच्या ग्रामीण भागातील एसटी बंद...
जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील तालुका लेवलच्या अनेक मार्गावरील फेऱ्या बंदच आहेत. खेड्यातील कोरोनाचे सावट अजून पूर्णत: टळलेले नाही.
मुंबई-पुणे मार्गावर गर्दी...
उद्यमशील पुणे-मुंबई मार्गावर गर्दीच गर्दी आजपासून, प्रवासी संख्या याच भागात कशी दिसत आहे. रोजगारानिमित्त कामगार युवक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे या मार्गावर प्रवासाला दिसत आहे.
प्रवाशांच्या गरजेनुसार बसेस..
कोरोनीचे सावट अजून टळलेले नाही, त्यामुळे आवश्यकतेनुसार प्रवासाच्या गरजेनुसार बसेस सोडण्यात येत आहे. ग्रामीण भागातील १००च्या जवळपास बसेस बंद असून, उत्पन्नातही घटच आहे.
-अरुण सिया, एसटी विभाग नियंत्रण
(८९४ डमी)