वाळूजसाठी वाहतूक शाखा

By Admin | Published: June 15, 2016 11:56 PM2016-06-15T23:56:16+5:302016-06-16T00:15:02+5:30

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसर व नगर रोडवरील वाढते अपघात व बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाळूज विभागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू केली आहे.

Transportation Branch for Silk | वाळूजसाठी वाहतूक शाखा

वाळूजसाठी वाहतूक शाखा

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसर व नगर रोडवरील वाढते अपघात व बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाळूज विभागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू केली आहे. बुधवारी सिडको वाळूज महानगरात या नवीन वाहतूक शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
सिडको वाळूज महानगर-१ मध्ये आयोजित कार्यक्रमात बुधवारी या नवीन वाहतूक शाखेचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आ. इम्तियाज जलील, आ. प्रशांत बंब, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंडे, खुशालचंद बाहेती, सुदर्शन मुंडे, रमाकांत बुवा, जि. प. सदस्य अनिल चोरडिया, सरपंच महेश भोंडवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी सभापती धनश्री कांबळे, मारुती गायकवाड, सिद्राम पारे, उपसरपंच विष्णू जाधव, सुनील काळे, हनुमान भोंडवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, वाहतूक शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस निरीक्षक जारवाल, संजय मिसाळ, संजय जाधव, अनिता डहारिया, सचिन गरड, बाळू राऊत, जनार्दन पा. निकम, राजेंद्र जाधव, सावजी पाटील, अर्जुन गायकवाड, शेख अब्दुल आदींची उपस्थिती होती.
६२ गावांची जबाबदारी
या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होत होती. अपघातही वाढले. या भागातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी वाळूज विभागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अवैध वाहतूक, अतिक्रमणे, चौकात मद्यपींचा उपद्रव, सदोष गतिरोधक या भागातील वाहतुकीच्या समस्या आहेत.
या नवीन कार्यालयात वाळूज व एमआयडीसी वाळूज या दोन्ही पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ६२ गावांचा समावेश करण्यात आला असून, एका पोलीस निरीक्षकासह २० पोलीस कर्मचाऱ्यांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे.

Web Title: Transportation Branch for Silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.