औरंगाबादमध्ये एसटी महामंडळाच्या पार्सल सुविधाद्वारे धोकादायक वस्तूंची वाहतूक; पोलीस आयुक्तालयाची ‘सीबीएस’ला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 03:25 PM2018-11-26T15:25:57+5:302018-11-26T15:29:31+5:30

एसटी महामंडळाच्या बसमधून पार्सलद्वारे स्फोटके, ज्वलनशील पदार्थ आणि हत्यारांची असुरक्षित वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Transportation of dangerous goods by the Parcel facility of ST corporation in Aurangabad; Notice to CBS by Police Commissioner | औरंगाबादमध्ये एसटी महामंडळाच्या पार्सल सुविधाद्वारे धोकादायक वस्तूंची वाहतूक; पोलीस आयुक्तालयाची ‘सीबीएस’ला नोटीस

औरंगाबादमध्ये एसटी महामंडळाच्या पार्सल सुविधाद्वारे धोकादायक वस्तूंची वाहतूक; पोलीस आयुक्तालयाची ‘सीबीएस’ला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयातील दहशतवादविरोधी कक्षाने मध्यवर्ती बसस्थानकाला एक नोटीस बजावली काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात एका पार्सलचा स्फोट झाल्याची घटनाही घडली होती.

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून पार्सलद्वारे स्फोटके, ज्वलनशील पदार्थ आणि हत्यारांची असुरक्षित वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील दहशतवादविरोधी कक्षाने मध्यवर्ती बसस्थानकाला एक नोटीस बजावली आहे. पार्सल, कुरिअरची खातर जमा करा, सीलबंद पार्सल घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना या नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

एका शहरातून दुसºया शहरात पार्सल पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडून एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना प्राधान्य दिले जाते; परंतु गेल्या काही वर्षांत बंदी असलेल्या वस्तूंची ‘एसटी’तून सर्रास वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात एका पार्सलचा स्फोट झाल्याची घटनाही घडली होती.

 स्फोटके, ज्वलनशील पदार्थांबरोबर तलवार, चाकू, सुरे अशा हत्याºयांची देवाण-घेवाण करण्यासाठी या पार्सल सेवेचा वापर केला जात असल्याचे पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालय कार्यालयाने यासंदर्भात मध्यवर्ती बसस्थानकास एक नोटीस बजावत खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक महिन्याला पार्सलसंदर्भातील विविध माहिती कळविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या नोटीसमुळे आगार व्यवस्थापकांनी एका पत्राद्वारे चालक-वाहकांना अनधिकृत पार्सल, सामान घेऊ नये, अशी सक्त सूचना केली आहे.

या आहेत सूचना

पार्सल, कुरिअरमध्ये असणाºया वस्तूंची सविस्तर नोंदणी रजिस्टरमध्ये करणे, वस्तूंची खातरजमा करणे, त्यात स्फोटके, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेणे, पार्सल, कुरिअर घेणाºयांचे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, शासकीय ओळखपत्र यापैकी एका ओळखपत्राची छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक घेणे, अशी सूचना नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा

कुरिअर पाठविण्यासाठी आलेल्या वस्तू पॅकबंद अथवा सीलबंद स्वीकारण्यात येऊ नये. वस्तू सीलबंद असल्यास त्या देणाºया इसमाच्या समक्ष उघडून खातरजमा करावी आणि पुन्हा सीलबंद करण्यात यावे. औद्योगिक कुरिअर अथवा नागरी कुरिअर सेवा देणाºया कंपन्यांनी मालाची ने-आणसाठी प्रवासी वाहनांचा वापर करू नये. यात निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Transportation of dangerous goods by the Parcel facility of ST corporation in Aurangabad; Notice to CBS by Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.