कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:02 AM2021-04-28T04:02:27+5:302021-04-28T04:02:27+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने हे सेंटर मंजूर झाले आहे. राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, करमाड ग्रामीण ...
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने हे सेंटर मंजूर झाले आहे. राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, करमाड ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये आजपासून रुग्णावर उपचार सुरू होत असून, करमाड ग्रामीण रुग्णालयासाठी एक्स्प्रेस लाइनमधून वीजजोडणीसाठी व स्वच्छ पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधिताना आदेश देण्यात येईल. यावेळी बांधकाम सभापती किशोर बलांडे, किरण पाटील डोणगावकर, नितीन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, पंचायत समिती सदस्य ताराबाई उकर्डे, सरपंच कैलास उकर्डे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अपर्णा रांजळकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य भाऊराव मुळे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता उकर्डे, कृष्णा उकर्डे, दत्ता कोरडे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
फोटो ओळ
करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरच्या शुभारंभप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, किशोर बलांडे, कैलास उकर्डे, डॉ.अपर्णा रांजळकर आदी.