वंध्यत्व उपचारावर औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय परिषद सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:11 AM2018-02-24T00:11:11+5:302018-02-24T00:11:48+5:30
भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपिस्ट असोसिएशन, औरंगाबाद स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग एण्डोस्कोपी व वंध्यत्व उपचार आंतरराष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी ३० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपिस्ट असोसिएशन, औरंगाबाद स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग एण्डोस्कोपी व वंध्यत्व उपचार आंतरराष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी ३० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या.
स्त्रियांमधील गर्भपिशवी, अंडाशय, गर्भनलिका व इतर आजारांवरील विविध शस्त्रक्रियांचा यात समावेश होता. सर्र्व शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. तज्ज्ञ मंडळींनी प्रत्येक शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. हाफिज रहमान, डॉ. प्रकाश त्रिवेदी, डॉ. रेतांन रिबेरो, डॉ. निकिता त्रेहान, डॉ. जोसेफ कुरियन, डॉ. बी. रमेश, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. किशोर पंडित, डॉ. नागेंद्र सरदेशपांडे यांच्यासह इतर नामवंत डॉक्टरांनी या शस्त्रकिया केल्या. शनिवारीही आणखी ३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
एण्डोवर्ल्ड हॉस्पिटल येथे शनिवारी सायं. ५ वा. परिषदेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी डॉ. हाफिज रहमान, डॉ. रेतांन रिबेरो या परदेशी डॉक्टरांसह भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपीस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेटकर, सचिव डॉ. सुनीता तांदुळवाडीकर, फॉग्सीचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश त्रिवेदी, डॉ. भास्कर पाल, यांच्यासह डॉ. पंडित पळसकर, डॉ. रिंकू पळसकर, डॉ. अर्चना गडकरी, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. विनोद भिवसने, डॉ. अजय माने, डॉ. कल्याण बरमडे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.