रांजणगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:19+5:302021-06-09T04:06:19+5:30
----------------- फुलेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष वाळूज महानगर : पंढरपुरातील फुलेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
-----------------
फुलेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर : पंढरपुरातील फुलेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागातील मशिदीच्या प्रवेशद्वारासमोर कचरा साचला असून, सर्वत्र दुर्गंधी पसरत आहेत. या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला असून नागरिक व भाविकांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून साफसफाई केली जात नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
------------------------
श्रीराम कॉलनीतून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूजच्या श्रीराम कॉलनीतून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विलास जवाहरलाल फतपुरे (रा. सिडको एन.७) यांनी रविवारी रात्री श्रीराम कॉलनीत दुचाकी (एम. एच.२०, सी.एन.९९९४) ही उभी केली होती. चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून ही दुचाकी चोरुन नेली.
----------------------------
भाजपाचे सिडकोला निवेदन
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी भाजपाच्या वतीने सिडकोच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या भागातील स्वच्छता, अंतर्गत रस्त्याची दुरवस्था, बंद पडलेले पथदिवे आदी समस्या सोडविण्यासाठी सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत प्रधान, पं. स. सतीश पाटील, मदन काळे, गंगाधर नखाते, महेंद्र जाधव आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
----------------------
कामगार चौकात अतिक्रमण वाढले
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात अतिक्रमणे वाढल्याने वाहनधारक व कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या चौकात हातगाड्यावर अनेकांनी व्यवसाय सुरु केले असून, खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
---------------------------