वाहन धुण्याच्या पाण्यातून फुलविली झाडे

By Admin | Published: May 31, 2016 11:52 PM2016-05-31T23:52:18+5:302016-06-01T00:11:23+5:30

औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत

Trees blown from the vehicle wash water | वाहन धुण्याच्या पाण्यातून फुलविली झाडे

वाहन धुण्याच्या पाण्यातून फुलविली झाडे

googlenewsNext


औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत. ग्राहक, परिसरातील मुलांमध्ये पाणी बचतीसाठी जागृती करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे.
साताऱ्यातील रेणुकामाता मंदिराजवळ सय्यद याकूब यांचे घर आणि गॅरेज आहे. २००९ या वर्षापासून ते साताऱ्यात वास्तव्यास आहेत. शिक्षण कमी झाले असले, तरी त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. काम करताना मिळणाऱ्या फावल्या वेळेत त्यांचे वाचन सुरू असते. ‘झाडाचे एक पान माणसाला ४० दिवस जिवंत ठेवण्याएवढ्या आॅक्सिजनचा पुरवठा करते,’असे याकूब यांच्या वाचनात आले होते. त्याच वेळी त्यांनी वृक्षारोपणात स्वत:ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.
झाडे लावणे सोपे असते, परंतु जगवून त्यांचे संवर्धन करणे ही कठीण गोष्ट असते. झाडे जगविण्यासाठी पाणी हे हवेच. साताऱ्यात तीव्र पाणीटंचाई असताना झाडांसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तरही अर्थात याकूब यांना मिळाले. घरातील सांडपाणी शेजारच्या नालीत सोडले जात होते. ग्राहकांची वाहने धुतल्यानंतर पाणी रस्त्यावर येऊ नये, यासाठी नालीतच त्याची विल्हेवाट लावली जात होती.
पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.

Web Title: Trees blown from the vehicle wash water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.