आगीत होरपळलेल्या झाडांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:02 AM2021-03-26T04:02:12+5:302021-03-26T04:02:12+5:30
तीन आठवड्यांपूर्वी सिडको वाळूज महानगरातील उद्यानाला माथेफिरूने आग लावली होती. आगीत उद्यानातील ६० झाडे होरपळली होती. वृक्षप्रेमी नागरिकांनी ...
तीन आठवड्यांपूर्वी सिडको वाळूज महानगरातील उद्यानाला माथेफिरूने आग लावली होती. आगीत उद्यानातील ६० झाडे होरपळली होती. वृक्षप्रेमी नागरिकांनी होरपळलेल्या झाडांना आळे करून पाणी दिले. या झाडांना पुन्हा पालवी फुटली असून झाडेही हिरवीगार झाली आहेत. सह्याद्री वृक्ष बँकेचे पोपट रसाळ, राजेश पाटील, नारायण सोनवणे, कृष्णा गुंड, संदीप तरटे, डॉ. गजानन काळे, डॉ. व्यंकटेश जांभळे, शेखर तांबे, भगवान आवसरमल, उमेश तांबट, नासिर शेख, योगेश दिवेकर, रत्नाकर मोरे, प्रशांत ताठे, ललिता खंडागळे, लीला मुथा, सुभाष खोसे, बलराज संघई, जनार्दन सूर्यवंशी, बापू भोसले, संजय संघवी, मयूर नरवडे आदींनी झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो ओळ
होरपळलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटून ही झाडे हिरवीगार झाली आहेत.