रांजणगाव फाट्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 09:19 PM2019-06-04T21:19:07+5:302019-06-04T21:19:15+5:30

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्यावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

The tremendous accident of three vehicles on Ranjangaon Falls | रांजणगाव फाट्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रांजणगाव फाट्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्यावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिनही वाहने रस्त्यावर अडकुन पडल्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर जवळपास अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती.


सिएट रोडकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या जीपचालकाने (एम.एच.२०,डी.ई.१९४० ) रांजणगाव फाट्याकडे वळण घेत असताना अचानक खाजगी बस (एम.एच.२०, ई.जी.७६६०) समोर आली. त्यामुळे जीप बसवर धडकली.

दरम्यान, या जीपच्या पाठीमागे असलेल्या टेम्पोचालकाने (एम.एच.२०, डब्ल्यु ८६०२) समोर जीप आल्यामुळे ब्रेक दाबले. मात्र, टेम्पो वेगात असल्यामुळे त्याने समोरील जीपला पाठीमागून जोराची धडक दिली. या विचित्र अपघातामुळे तीन्ही वाहने रस्त्यात अडकली. या अपघात जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पो व बसचे किरकोळ नुकसान झाले असून, यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.


अर्धातास वाहतूक कोंडी
या विचित्र अपघातामुळे या मुख्य रस्त्यावर तिन्ही वाहने आडकल्यामुळे या मार्गावरील रांजणगावकडून पंढरपूरकडे जाणारी शेकडो वाहने जागेवरच थांबली होती. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुली केली.

दरम्यान, या अपघातामुळे एनआरबी चौक ते रांजणगाव फाट्यापर्यंत वाहने एकाच जागी थांबल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. यानंतर वाळूज वाहतुक शाखेच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठुन मदत केल्यामुळे अर्ध्या तासानंतर वाहतुकीची कोंडी सुटली.

Web Title: The tremendous accident of three vehicles on Ranjangaon Falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.