नांदेडकरांमध्येही रूजतोय ढोलताशांचा ट्रेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:26 AM2017-08-26T00:26:13+5:302017-08-26T00:26:13+5:30
डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने उत्सव काळातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपसुकच पारंपरिक वाद्यांना पसंती दिली जात आहे़ तर नांदेडकरांमध्ये पुणे, मुंबईप्रमाणे ढोलताशांचा नवा ट्रेंड निर्माण होत आहे़ बाप्पाच्या स्वागतासाठी शुक्रवारी शहरात निघालेल्या मिरवणुकीत ढोलताशांचा गजर ऐकायला मिळाला़
श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने उत्सव काळातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपसुकच पारंपरिक वाद्यांना पसंती दिली जात आहे़ तर नांदेडकरांमध्ये पुणे, मुंबईप्रमाणे ढोलताशांचा नवा ट्रेंड निर्माण होत आहे़ बाप्पाच्या स्वागतासाठी शुक्रवारी शहरात निघालेल्या मिरवणुकीत ढोलताशांचा गजर ऐकायला मिळाला़
नांदेडसह जिल्हाभरात आज तीन हजारांहून अधिक ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात झाली़ आतापर्यंत मुंबई-पुणे येथील गणपती बाप्पाचे स्वागत, विसर्जन मिरवूणक आदी कार्यक्रमांतील ढोलतांशाचा गजर टीव्हीवर पाहणारे नांदेडकर ढोलताशांचा नाद प्रत्यक्ष अनुभवत आहेत़
डीजेवर आलेल्या बंदीनंतर बॅण्ड आणि तत्सम वाद्यांना महत्त्व प्राप्त झाले़ त्यातच नांदेडकर तरूणांनी ढोलताशा पथक स्थापन करून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे़ ढोलताशे म्हटले की, पूर्वी पुण्याचे नाव पुढे यायचे, परंतु नांदेडच्या तरूणांनी पुणेकरांची मक्तेदारी मोडीत काढली आहे़
डीजेच्या एट्रीमुळे पारंपरिक वाद्य वाजवणाºयांना वाईट दिवस आले होते़ मात्र प्रशासनाने डीजे संदर्भात ठोस भूमिका घेतल्याने बहुतांश गणेश मंडळने पारंपरिक वाद्यांकडे वळल्याचे चित्र यंदा मिरवणुकांमध्ये दिसून आले.