कोपर्डी दुर्घटनेतील भगिनीस सकल मराठा समाजातर्फे श्रद्धांजली
By बापू सोळुंके | Published: July 13, 2023 02:42 PM2023-07-13T14:42:30+5:302023-07-13T14:43:00+5:30
कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर चार नाराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाले
छत्रपती संभाजीनगर : 13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीची शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी. हीच, त्या पिडितेला श्रद्धांजली ठरेल आणि तिला न्याय मिळेल अशी भावना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने टीव्ही सेंटर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर चार नाराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाले .या घटनेनंतर एकवटलेला मराठा समाजाचे मराठा क्रांती मोर्चा मध्ये रूपांतर झाले कोपर्डीच्या भगिनींना न्याय द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आणि अन्य मागण्यासाठी राज्यात 58 मोर्चे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आले . या मोर्चाची पहिली सुरुवातही छत्रपती संभाजी नगर मधून झाली होती. आज सकल मराठा समाजाच्यावतीने टीव्ही सेंटर येथे आयोजित श्रद्धांजली सभेमध्ये त्या पिडीतेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे दिले असून सुद्धा सात वर्षात या भगिनीला न्याय मिळालेला नाही . महिला अत्याचार थांबलेले नाहीत . राज्य सरकारने तात्काळ या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी .या भगिनीस जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली तिला ठरणार नाही, असा सूर यावेळी उपस्थितांमध्ये उमटला. यावेळी सुरेश वाकडे ,सतीश वेताळ, मनोज गायके ,सुनील सोळंके सर, प्रदीप हारदे, गणपत मस्के, अजय गंडे ,योगेश औताडे, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे,तनश्री गायकवाड,अनिल तुपे,योगेश देशमुख, रतन काळे, शिवाजी भिंगारे ,संदीप जाधव,विवेक कानड़खेडकर, आप्पासाहेब औताडे, प्रकाश बनकर,विलास औताडे ,शिवाजी पळसकर,संजय जाधव ,रविऔताडे, भगवान देवकर,सचिन शिंदे,संतोष काकडे,अक्षय लोंढे,गिरीश झाल्टे,रामदास गायकवाड़, विनोद शिरोळे आदी उपस्थित होते..