अजिंठ्यातील गांधी चौकात अखेर फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:57+5:302021-09-18T04:05:57+5:30
१५ ऑगस्ट व २६ जानेवारीला नेहमी गांधी चौकात सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते व ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच ध्वजारोहण ...
१५ ऑगस्ट व २६ जानेवारीला नेहमी गांधी चौकात सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते व ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच ध्वजारोहण करतात. १५ ऑगस्ट रोजी सरपंच नजीर अहमद यांनी गांधी चौकातील झेंडा फडकावला होता. आतापर्यंतच्या परंपरेनुसार नेहमी सरपंचाला गांधी चौकात झेंडा फडकविण्याचा मान दिला जातो, पण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला तिरंगा फडकविण्यासाठी आधी परवानगी नाकारण्यात आली. कशी तरी परवानगी मिळाली. मात्र, सरपंचांनी येथे झेंडा न फडकविता तो सन्मान उपसरपंच अशोक झलवार यांना दिला, तर त्यांनी स्वत: ग्रामपंचायत कार्यालयात झेंडा फडकविला. यावेळी भाजप नेते सुरेश बनकर, भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमेलश कटारिया, इंद्रिस मुलतानी, मेघराज चोंडिये, रघुनाथ चव्हाण, प्रकाश शिंदे, शिवप्रसाद पुरे, रतन गुप्ता, विजय पगारे, सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो :
170921\img_20210917_190153.jpg
क्याप्शन
अजिंठा गांधी चौकात उपसरपंच अशोक झलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शिवप्रसाद पुरे, सुरेश बनकर,कमलेश कटारिया, रघुनाथ चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, मदानसिंग राजपूत, लखन अस्तुरे दिसत आहे.