उदगीर भागात वृक्षतोड
By Admin | Published: May 20, 2014 12:20 AM2014-05-20T00:20:35+5:302014-05-20T01:11:53+5:30
उदगीर : उदगीर तालुक्यात दररोज होणार्या बेसुमार वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिलकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.
उदगीर : उदगीर तालुक्यात दररोज होणार्या बेसुमार वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिलकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. उदगीर तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यात आंबा, चिंचेच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वृक्षतोड केल्यानंतर हा लाकूड शहर व तालुक्यात असलेल्या सॉ मिलवर आणला जातो. दररोज २० ते २५ ट्रक्स लाकूड सॉ मिलवर आणला जातो. शहरात फक्त १६ सॉ मिल्सना वन विभागाची परवानगी असताना शहर व तालुक्यात विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिल्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायप्रविष्टच्या नावाखालीही अनेक सॉ मिल्स सुरू आहेत. उदगीर तालुक्यात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वनरक्षक व एका वन परिमंडळ अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे. वनरक्षक मुख्यालयी राहतात, मात्र वनपरिमंडळ अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून आपला कारभार पाहतात. संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविलेले हत्तीबेट निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाची कामेही या वनपरिमंडळ अधिकार्याकडे देखभालीसाठी आहेत. महिनेच्या महिने हे अधिकारी हत्तीबेटावर येत नसल्यामुळे निसर्ग पर्यटनाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. वन विभागाच्या दुर्र्लक्षामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) उदगीर तालुक्यात १६ सॉ मिल्सना वन विभागाची रितसर परवानगी आहे. याशिवाय, अधिक सॉ मिल्स सुरू असतील तर त्या वरिष्ठांना सोबत घेऊन तपासल्या जातील व वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर रितसर कार्यवाही करतील. -टी.बी. वंजे, वननिरीक्षक