कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:21+5:302021-03-16T04:04:21+5:30

सिल्लोड : कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या एका धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने कापसाच्या ६० गाठींसह ट्रकचा अर्धा भाग जळून ...

A truck carrying cotton bales caught fire | कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

googlenewsNext

सिल्लोड : कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या एका धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने कापसाच्या ६० गाठींसह ट्रकचा अर्धा भाग जळून खाक झाला आहे. यात सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ही दुर्घटना रविवारी दुपारी औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला लावला व उडी घेतल्याने त्याचे प्राण बालंबाल बचावले.

तालुक्यातील लिहाखेडी येथील जिनिंगमधून ट्रक (एमएच २० एटी २५९५) हा कापसाच्या गाठी घेऊन डोंगरगाव फाट्याजवळ असलेल्या एका जिनिंगमध्ये जात होता. दरम्यान, मंगरूळ फाट्याजवळ ट्रकला अचानक आग लागली. ही बाब ट्रकचालक अंबादास फरकाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला लावला व मदतीसाठी महामार्गावरील नागरिकांना आवाहन केले. तोपर्यंत ट्रकमधील जवळपास कापसाच्या साठ गाठी जळून खाक झाल्या होत्या, तर ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले.

मंगरूळ फाट्यावरील वाहतूक पोलिसांची चौकी आहे. येथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी वाघ यांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल येईपर्यंत रस्त्यावरील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलीस मित्र अंबादास दांडगे, कृष्णा बर्डे, बालाजी बर्डे यांनी मदत करीत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

--

दुसरा ट्रक बोलावून ४० गाठी खाली उतरविल्या

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या या ट्रकमध्ये शंभर गाठी होत्या. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यात जवळपास ६० गाठी जळून खाक झाल्या तर ट्रकचा अर्धा भाग जळाला गेला. दरम्यान, महामार्गावरील लोकांनी अग्निशमन बंब येण्यापूर्वी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. यात ४० कापसाच्या गाठी आगीतून बाहेर काढण्यात आल्या. ट्रकचालक अंबादास फरफाडे यांनी दुसरा ट्रक मदतीला बोलावून आगीतून ४० गाठी सुखरूप काढल्या.

फोटो : कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागलेली आग, यात कापसाच्या ६० गाठी जळून खाक झाल्या असून, ट्रकचेही नुकसान झाले.

Web Title: A truck carrying cotton bales caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.