गजाळी घेवून जाणारा ट्रक पुलात पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:01 AM2017-11-01T00:01:04+5:302017-11-01T00:01:10+5:30
वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबा चौंढा : वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला.
चालक मिर्जा साहेब बेग (५२, रा. निजामबाद) हा जालना येथून लोखंडी गजाळी घेवून निजबादकडे जात असतना कार्टाजवळ असलेल्या कल्याण टोल नाकाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीने जोराचा कट मारला. यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ते धामणगाव पाटीजवळ एका छोट्या पुलाच्या कठड्या तोडून ट्रक कोसळला व मोठा आवाज ऐकून शेतातील आखाड्यावरील शेतकरी, ऊसतोड मजूर धावत येवून चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. चालकास डोक्याला व हाताला मार लागला. स्कॉर्पिओ जीपने कट मारल्यामुळे त्याला वाचविण्याच्या नादात हे घडल्याचे चालक म्हणाला.
हा रस्ता अरूंद असून साईडपट्ट्याचा भरणाही कित्येक दिवसांपासून केल नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.