ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले...

By Admin | Published: June 30, 2017 12:14 AM2017-06-30T00:14:00+5:302017-06-30T00:18:26+5:30

औरंगाबाद: सिडको एन-३ येथील येथील वर्दळीच्या रस्त्यावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत लिंबाच्या झाड कोसळल्याने झालेल्या भीषण घटनेत १२ वर्षीय बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शेकडो लोक बालंबाल बचावले.

Truck collapses; Students escaped from school ... | ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले...

ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद: सिडको एन-३ येथील येथील वर्दळीच्या रस्त्यावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत लिंबाच्या झाड कोसळल्याने झालेल्या भीषण घटनेत १२ वर्षीय बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शेकडो लोक बालंबाल बचावले. ही घटना सिडको एन-३ येथील एका गल्लीत दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
राहुल मच्छेवार (१२,रा.हनुमाननगर)असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो संत मीरा शाळेत सातवीत शिकतो.पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-३ येथील एका घराचे बांधकाम सुरू आहे.हे काम करण्यासाठी वाळूचा ट्रक आणण्यात आला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास हा ट्रक अचानक रस्त्याशेजारील लिंबाच्या झाडाला धडकला आणि झाड खोडापासून मोडून रस्त्यावर पडले. यावेळी राहुल हा शाळेतून घरी जात होता. त्याच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो खाली कोेसळला. यावेळी झाड पडण्यामुळे झालेल्या आवाजाने अनेक दुचाकीचालक आणि लोक घाबरुन पळत सुटले. काहींनी धावत्या दुचाकी सोडल्या तर काहींनी प्रसंगावधान राखून अनेकांना बाजुला ओढल्याने ते बालंबाल बचावले. या घटनेत मात्र एका मोपेडचे आणि महाविरतणच्या विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनतर परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला. अपघात घडताच चालक ट्रक सोडून तेथून पसार झाला. घटनास्थळावरून ट्रक पुंडलिकनगर ठाण्यात नेण्यात आला.

Web Title: Truck collapses; Students escaped from school ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.