ट्रकचालकाने स्पेअर पार्टस लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:16+5:302021-06-16T04:06:16+5:30
:वाळूज एमआयडीसीतील घटना वाळूज महानगर : ट्रकचालकाने जवळपास एक लाख रुपये किमतीचे दुचाकीचे स्पेअर पार्टस परस्पर लांबविल्याची घटना ...
:वाळूज एमआयडीसीतील घटना
वाळूज महानगर : ट्रकचालकाने जवळपास एक लाख रुपये किमतीचे दुचाकीचे स्पेअर पार्टस परस्पर लांबविल्याची घटना नुकतीच वाळूज एमआयडीसीत उघडकीस आली आहे. ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील गणेश प्रेस एन. कोट इंडस्ट्रिज या कंपनीत दुचाकीसाठी लागणारे स्पेअर पार्टस तयार करण्यात येतात. या कंपनीची दुसरी शाखा आहे. महिनभरापूर्वी ट्रॉन्सपोर्टच्या वाहनातून कंपनीचा माल चोरी होत असल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. ४ जूनला मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ट्रकचालक (एम.एच.०९, बी.एल.९३४६) संतोष बाबूराव मुंढे हा दुचाकीचे स्पेअरपार्ट ट्रकमध्ये भरून दुसऱ्या युनिटमध्ये पोहोच करण्यासाठी निघाला होता. मात्र, त्याने स्पेअर पार्टस न पोहोचविल्यामुळे कंपनीचे व्यवस्थापक शिरीष राजेभोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालक संतोष मुंढे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.