ट्रकने दुचाकीला धडक देऊन ५० मीटरपर्यंत फरफटले; नशीब बलवत्तर म्हणून पती-पत्नी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 12:07 PM2021-04-02T12:07:14+5:302021-04-02T12:10:20+5:30

Husband and wife survived in accident at Waluj तिरंगा चौकाजवळ औरंगाबादकडून नगरकडे दगडी कोळसा घेऊन वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१६, टी.१२३३) दांगुडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

The truck hit the two-wheeler and skidded for 50 meters; Husband and wife survived as luck would have it | ट्रकने दुचाकीला धडक देऊन ५० मीटरपर्यंत फरफटले; नशीब बलवत्तर म्हणून पती-पत्नी बचावले

ट्रकने दुचाकीला धडक देऊन ५० मीटरपर्यंत फरफटले; नशीब बलवत्तर म्हणून पती-पत्नी बचावले

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रभान सखाराम दांगुडे (रा. वाणेगाव, ता. फुलंब्री) हे पत्नी चंद्रकला दांगुडे यांच्यासह दुचाकीने (एम.एच.२०, सी.एक्स २७१७) बजाजनगरात नातेवाइकास भेटण्यासाठी चालले होते. ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी जोराच्या धक्क्याने दूर फेकले जाऊन रस्त्यावर बाजूला पडले, तर ट्रकच्या खाली दुचाकी अडकल्यानंतर चालकाने न थांबता सुसाट ट्रक दामटला.

वाळूज महानगर : भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानंतर दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना गुरुवारी (दि. १) दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात घडली. ट्रकचा धक्का लागल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी दूर फेकल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले; परंतु सुदैवाने बालंबाल बचावले.

चंद्रभान सखाराम दांगुडे (रा. वाणेगाव, ता. फुलंब्री) हे पत्नी चंद्रकला दांगुडे यांच्यासह दुचाकीने (एम.एच.२०, सी.एक्स २७१७) बजाजनगरात नातेवाइकास भेटण्यासाठी चालले होते. तिरंगा चौकाजवळ औरंगाबादकडून नगरकडे दगडी कोळसा घेऊन वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१६, टी.१२३३) दांगुडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पती-पत्नी जोराच्या धक्क्याने दूर फेकले जाऊन रस्त्यावर बाजूला पडले, तर ट्रकच्या खाली दुचाकी अडकल्यानंतर चालकाने न थांबता सुसाट ट्रक दामटला. पंढरपुरातील मच्छी मार्केटमसोर नागरिकांनी आरडा-ओरड करून ट्रक रोखला. संतप्त जमावाने ट्रक चालकास चांगलाच चोप दिला. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्धन गवळी, पंढरीनाथ साबळे, शेख बाबर, शेखर राऊतराय, सचिन खरात, आदींनी घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून ट्रकचालकाची सुटका केली.

दुचाकीला ५० मीटरपर्यंत फरफटत नेले
या अपघातानंतर मारहाणीच्या भीतीने ट्रकचालकाने घटनास्थळावरून वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यात ट्रकखाली अडकलेल्या दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. नागरिक व वाहनधारकांनी आरडा-ओरड करून ट्रक चालकास ट्रक थांबविण्यास भाग पाडले. केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून या अपघातात दांगुडे पत्नी-पत्नी बालंबाल बचावले. अपघातानंतर किरकोळ जखमी दाम्पत्यास नागरिकांनी धीर देत पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर या दाम्पत्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या अपघाताची माहिती ट्रक चालकाने मालकास दिल्याने किरकोळ जखमी दाम्पत्यांची भेट घेऊन रुग्णालयाचा खर्च व दुचाकीचे झालेले नुकसान भरून देण्याची तयारी मालकाने दर्शविल्याने हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

वाहनांच्या लांबच-लांब रांगा
नागरिकांनी काही अंतरावर हा ट्रक अडवून चालकास चोप दिला. यामुळे रस्त्यावर मोठा जमाव जमला. ट्रक रस्त्यावर उभा असल्याने औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Web Title: The truck hit the two-wheeler and skidded for 50 meters; Husband and wife survived as luck would have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.