औरंगाबाद येथून चोरीस गेलेला ट्रक धुळ्यात सापडला
By Admin | Published: May 4, 2017 01:36 PM2017-05-04T13:36:02+5:302017-05-04T13:36:02+5:30
धुळे शहर पोलिसांची कारवाई . अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार
धुळे ,दि.4- औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमधील वाळूंज येथून 11 एप्रिल रोजी चोरीस गेलेला ट्रक धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने महामार्गावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील हॉटेल भंडारा येथे ताब्यात घेतला. मात्र पोलिसांची नाकेबंदी पाहून चोरटे ट्रक उभा करुन अंधारात फरार झाले. वाळूंज औद्योगिक वसाहतीमधून 11 एप्रिल 2017 रोजी पीव्हीसी पाईप, खुच्र्या घेऊन जाणारा एम.एच.04 सीपी 2691 क्रमांकाचा ट्रक चोरीस गेली होती. तो ट्रक धुळ्याकडे येत असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दुरध्वनीवरुन धुळे शहर पोलीस स्टेशनला दिली. त्या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रात्री चाळीसगाव व मालेगाव महामार्गावर गस्त वाढवून नाकाबंदी करुन तपासणी सुरु केली. बुधवारी रात्री हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ तपासणी सुरु असतांना हॉटेल भंडाराजवळ एक ट्रक संशयितरित्या उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी पाहिले असता ट्रकचा नंबर औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या नंबर एकच असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा पथकातील पोलिसांनी ट्रक लावणा:या चोरटयांचा तपास केला. परंतू ते आढळून आले नाही. पोलिसांना पाहून चोरटे अंधारात ट्रक लावून पसार झाल्याचे स्पष्ट झाले. पथकाने ट्रक ताब्यात घेऊन तो शहर पोलीस स्टेशनला आणून लावला. यानंतर पोलिसांनी ट्रक संदर्भात औरंगाबाद पोलिसांना माहिती दिली.