नवल मालू यांच्या ३५ वर्षांच्या जनसेवेचा खरा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:42+5:302021-09-18T04:05:42+5:30
औरंगाबाद : लायन्स बिरादरीतील सर्वोच्च सन्मान ‘ॲम्बेसेडर ऑफ द गुडविल पुरस्कार’ डॉ. नवल मालू यांना मिळाला आहे. मागील ...
औरंगाबाद : लायन्स बिरादरीतील सर्वोच्च सन्मान ‘ॲम्बेसेडर ऑफ द गुडविल पुरस्कार’ डॉ. नवल मालू यांना मिळाला आहे. मागील ३५ वर्षांत त्यांनी निष्ठेने केलेल्या समाजसेवेचा हा खरा सन्मान आहे, असे गौरवोद्गार लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.
‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ संस्थेत ३ वर्षे आंतरराष्ट्रीय संचालकपद भूषविणारे डॉ. नवल मालू यांना २०२०-२१ या वर्षासाठी ‘ॲम्बेसेडर ऑफ गुडविल पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष युंग चूल चोई यांनी जाहीर केला. यानिमित्त गुरुवारी रात्री आयोजित शानदार कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनल फाऊंडेशनचे विश्वस्त अरुणा ओसवाल यांच्या हस्ते डॉ. मालू यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र दर्डा तर अध्यक्षस्थानी प्रांतपाल दिलीप मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुणा ओसवाल यांनी डॉ. नवल मालू यांना मेडल देऊन गौरव केला, तर राजेंद्र दर्डा यांनी प्रशस्तिपत्र प्रदान केले.
या वेळी दर्डा यांनी सांगितले की, डाॅ. मालू यांनी स्वत:च्या मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संचालकपद प्राप्त केले. वर्ल्ड मेंबरशिप कमिटीच्या त्यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात लायन्सच्या सदस्य संख्येत भारत जगात नंबर एक झाला, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.
अरुणा ओसवाल म्हणाल्या की, डॉ. मालू हे लायन्सच्या वृद्धीसाठी ते नेहमी क्रियाशील असतात. निश्चित उद्दिष्ट समोर ठेवून ते ठोस पावले उचलत असतात. त्यांची निष्ठा व सेवाभाव वाखाणण्याजोगी आहे. दिलीप मोदी म्हणाले, हा सोहळा प्रत्येक लायन्स सदस्याला नवऊर्जा देणारा आहे. सूत्रसंचालन विशाल लदनिया यांनी केले. या वेळी जयेश ठक्कर, सीए विवेक अभ्यंकर, विजय गोयल, प्रकाश गोठी, पुरुषोत्तम जयपुरिया, सुनील देसरडा, संदीप मालू, राजेश राऊत, महावीर पाटणी, विजय बगडिया, तनसुख झांबड, अरविंद माछर आदींची प्रमुख उपस्थिती होती. आयोजन बी. एस. राजपाल, एन. के. गुप्ता व डॉ. मनोहर अग्रवाल हे होत. या गौरव सोहळ्यात डॉ. नवल मालू यांच्या मातोश्री जसोदादेवी मालू व दोन भाऊही उपस्थित होते.
चौकट
हा पुरस्कार समाजसेवेतील सर्व कार्यकर्त्यांचा
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. नवल मालू यांनी सांगितले की, हा लायन्सचा सर्वाेच्च पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समाजसेवेच्या क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांचा आहे. या पुरस्काराने माझी आणखी जबाबदारी वाढली आहे. भविष्यात अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास हा पुरस्कार सतत प्रेरणादायी ठरेल.
चौकट
प्रमाणपत्र देऊन गौरव
राजेश भारुका, आशीष अग्रवाल, डॉ. मनोहर अग्रवाल, अतुल लड्डा यांना वर्तमान आंतरराष्ट्रीय अध्यक्षांद्वारा प्राप्त गौरव प्रमाणपत्र या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. कॅबिनेट सचिव डॉ. विजय भारतीया यांचा लीडरशिप मेडल देऊन गौरव केला.