कोल्ह्यातील बिबट्याने फाडला वनविभागाचा बुरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:20+5:302016-03-16T08:29:40+5:30

नांदेड :गत दोन दिवसांपासून बिबटे आढळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत़, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल १३ तास उपाशीपोटी असलेला बिबट्या विहिरीत अडकून पडला होता़

The trunk of a fox has broken down the forest section | कोल्ह्यातील बिबट्याने फाडला वनविभागाचा बुरखा

कोल्ह्यातील बिबट्याने फाडला वनविभागाचा बुरखा

googlenewsNext

नांदेड :गत दोन दिवसांपासून बिबटे आढळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत़, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल १३ तास उपाशीपोटी असलेला बिबट्या विहिरीत अडकून पडला होता़ कोणत्याही तयारीविना आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी मदत केली़ ग्रामस्थांच्या गोंगाटामुळे बिथरणाऱ्या बिबट्याने डरकाळी फोडत वनविभागाच्या नियोजनशून्यतेचा बुरखाच फाडला़
मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे शिकारीसाठी आलेला बिबट्या शेतकऱ्याच्या पाठलागानंतर विहिरीत पडला़ जवळपास ४० फूट खोल विहिरीत सोमवारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्याबाबत वनविभागाला रात्रीच माहिती मिळाली होती़, परंतु शासकीय काम अन् चार महिने थांब़़़अशा म्हणीप्रमाणे सकाळी दहा वाजता वनविभागाचे अधिकारी दाखल झाले़ यावेळी त्यांच्यासोबत स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधीही होते़ पोलिस फौजफाटाही मोठा होता़ परंतु कोणतेही नियोजन नसल्यामुळे फक्त पिंजरा घेवून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़
त्यानंतर जेसीबी, दोरी व इतर साहित्य आणण्यासाठी विलंब लागतच गेला़ त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली़ त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला़ या दरम्यान, बिबट्याच्या मुखदर्शनासाठी आलेल्या अनेकांना पोलिसांना प्रसाद द्यावा लागला़ तीन वेळेस जेसीबीच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला़, परंतु दोरी तुटल्याने वेळेवर दरवाजाच बंद झाला नाही़ त्यात नागरिकांच्या गोंगाटामुळे बिथरलेला बिबट्या डरकाळी फोडत असताना, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मोबाईलवर बिबट्याचे फोटो काढण्याची हौस भागवून घेतली़ धोकादायक पद्धतीने बिबट्याच्या भोवताल नागरिकांनी कडे केले होते़, परंतु त्यांना अटकाव करण्यास सर्वांनाच अपयश आले़ दुपारी तीन वाजता पिंजऱ्यात आलेल्या बिबट्याला थोड्या वेळानंतर जंगलात सोडले़, परंतु या प्रकारामुळे वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आला़ (प्रतिनिधी)
१ लाख २० हजार हेक्टर वनक्षेत्र आहे़ एवढ्या मोठ्या वनसंपदेत वन्यप्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे़, परंतु याबाबत नेमकी आकडेवारी वन विभागाकडेही नाही़ वन्य प्राण्यांची पाणवठ्यावर मोजणी होत असून एवढ्यात अशाप्रकारची कोणतीही मोजणी झाली नसल्याचे उपवनसरंक्षक सुजय डोडल यांनी सांगितले़ त्याचबरोबर वन्यप्राणी हे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत नसून त्याची कारणे वेगवेगळी आहेत़
जिल्ह्यातील जंगलात २१४ नैसर्गिक पाणवठे असून त्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी आहे असेही वनविभागाचे म्हणणे आहे़ परंतु सध्या नांदेडला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ मुखेड, कंधार, लोहा, हदगांव, भोकर या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना, वन्य प्राण्यांची अवस्था तर त्यापेक्षा वाईट आहे़
बिबट्या पकडण्याची पद्धत चुकीची...
बिबट्या पकडण्यासाठी फायबरचा आणि बिबट्याच्या आकारापेक्षा मोठा पिंजरा असणे आवश्यक आहे, परंतु वनविभागाने तब्बल १२ क्विंटल वजनाचा अवजड पिंजरा आणला होता़ नागरिकांच्या गोंगाटामुळे बिबट्या बिथरल्यास त्याच्या डोक्याला किंवा इतर अवयवांना ईजा होवू नये म्हणून वनविभागाने पिंजरा फायबरचा वापरावा, असे नियम घालून दिले आहेत़ परंतु त्याला हरताळ फासण्यात आला़ बिबट्यासारखा प्राणी रागिष्ट प्राणी पकडताना योग्य नियोजन आवश्यक असते़, परंतु विहिरीपासून बऱ्याच अंतरावर जेसीबी होती़ त्याद्वारे पिंजरा विहिरीत सोडण्यात येत होता़ विहिरीत हा पिंजरा सोडताना अनेकवेळा बिबट्या त्याखाली येण्याची शक्यता होती़ केवळ अंदाजावर तो पिंजरा खाली सोडण्यात येत होता़ बिबट्या जर त्याखाली आला असता तर, त्याला मोठी दुखापत झाली असती़ पिंजऱ्याला आतील भागातून सुरक्षेसाठी आवरण असणे आवश्यक असते, तेही नव्हते़ पिंजऱ्यात आल्यानंतर बिबट्याची शेपटी अनेकवेळा त्याच्या दरवाजात अडकून तुटते़ त्यामुळे त्याची लांबी आणि रुंदी याबाबतचे सर्व निकषही वनविभागाने पायदळी तुडविले़ पिंजऱ्यातील प्राण्याचे छायाचित्र घेवू नये, असे असताना, अनेक कर्मचारी अन् अधिकारी सेल्फी विथ बिबट्याची हौस भागवून घेत होते़

Web Title: The trunk of a fox has broken down the forest section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.