महापालिकेच्या कर्जमुक्तीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:07 AM2017-11-15T01:07:18+5:302017-11-15T01:08:19+5:30
महापालिकेकडे २०१३ पासूनचे कंत्राटदारांचे देयके थकित आहेत. ही देयके अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच कर्जातून विकास करण्याचे प्रयत्न मनपा करणार नसून पहिल्यांदा महापालिका कर्जमुक्तीसाठी पावले उचलेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हरात आजघडीला प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन वाहनातून नव्हे, तर पायी चालणेही कठीण झाले आहे. महापालिकेने कामांच्या निविदा काढल्या असल्या तरीही त्यांना मिळणाºया प्रतिसादाचाही विचार करावा लागणार आहे. शासनाने महापालिकेला दीडशे कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. यातील ५० कोटींच्या रकमेतून जुने जादा व्याजदर असलेले कर्ज महापालिकेने फेडले आहे. कमी व्याजदराने आवश्यक ते कर्ज घेतले आहे.
त्याचवेळी शहरात असलेल्या जेएनएनयुआरएम आणि नगरोत्थान योजनेतील अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने कर्ज मंजूर केले आहे. या मंजूर केलेल्या कर्जातून महापालिका तीच अर्धवट कामे पूर्ण करु शकणार आहेत. कर्ज देताना शासनाने ती अटच घातली आहे. त्यामुळे अन्यत्र निधी खर्च करणे ही बाब प्रशासनाच्या अंगलट येणार आहे. आगामी काळात प्रशासनाला अंगलट येणारी कामे करणे म्हणजे कारवाईला निमंत्रण देणेच ठरणार आहे.
महापालिकेची आजघडीची आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ करणे अपरिहार्य आहे. त्यात आहे त्या करवसुलीची गती वाढवली जाणार आहे. मंगळवारी कर वसुलीसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर वसुलीला गती देण्याचे आदेश दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले. या कर वसुलीतून जुनी देणी अदा करुन नव्या कामांना प्रारंभ केला जाईल. शहरातील प्रमुख कामे निश्चितपणे केली जाईल मात्र कर्जातून विकास हा पर्याय आजघडीला तरी महापालिकेला परवडणारा नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.