मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:36 AM2017-09-13T00:36:26+5:302017-09-13T00:36:26+5:30

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची १४ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

Trying to increase the percentage of voting | मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची १४ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, एनएसएसचे प्राध्यापक, स्काऊट गाईड, एनसीसीचे सर्व कॅडेट यांची बैठक १४ सप्टेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्त देशमुख यांनी केले.
दरम्यान, मंगळवारी महापालिका निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या संदर्भात उमेदवारांनी अर्ज कसे भरावेत याबाबतची माहिती इंटरनेट कॅफे चालकांना देण्यात आली. सेतू सुविधामार्फत चालणाºया केंद्र चालकांना मंगळवारी महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये फॉर्म भरताना येणाºया तांत्रिक अडचणी, विशिष्ट शब्दाचे अर्थ आयुक्तांनी विस्तृतपणे सांगितले. यावेळी उपायुक्त संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती. या संगणक चालकांना १४ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे.
१६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून उमेदवारांनी शेवटच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी न करता प्रारंभीपासूनच अर्ज भरावेत. अर्ज भरताना संपूर्ण माहिती भरावी. तसेच खोटी माहिती सादर करु नये, असेही त्यांनी सांगितले. शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. रस्त्यावर कुठेही होर्डिंग्ज नसून शहरात कुठेही एकही होर्डिंग्ज विनापरवाना नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. याबाबत क्षेत्रीय अधिकाºयांचे शपथपत्र घेण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त जे़एस़ सहारिया आज नांदेडात
राज्य निवडणूक आयुक्त जे़एस़ सहारिया हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये येत आहेत. आयुक्त सहारिया यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका निवडणुकीचा व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नोडल आॅफिसर, निवडणूक अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आयकर अधिकारी उपस्थित राहतील.

Web Title: Trying to increase the percentage of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.