तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव

By Admin | Published: November 14, 2015 12:11 AM2015-11-14T00:11:00+5:302015-11-14T00:50:00+5:30

तुळजापूर : दिवाळीतील पाडव्याचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरात रंगीबेरंगी रांगोळ्या तसेच हजारो दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Tulajbhavani temple festival | तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव

तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव

googlenewsNext


तुळजापूर : दिवाळीतील पाडव्याचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरात रंगीबेरंगी रांगोळ्या तसेच हजारो दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय संस्कार भारती आणि स्वरयात्री यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन नगराध्यक्षा जयश्री कंदले व विजय कंदले यांच्या हस्ते झाले. चाळीस कलावंतांनी यात सहभाग घेऊन नेत्रदीपक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. दीपोत्सव पाहण्यासाठी आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. सायंकाळी विठ्ठल मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, रोटरीचे अध्यक्ष सचिन ताकमोघे, माजी उपाध्यक्ष सुहास साळुंके यांच्या हस्ते झाले. यात प्रा. रामलिंग थोरात, संतोष रोकडे, सुदेश थोरात, रायखेलकर, मंजुषा कुलकर्णी, रेणुका वट्टे, कलशेट्टी या कलावंतांनी भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत तसेच चित्रपट गिते सादर केली. यासाठी प्रवीण नाडापुडे, संदीप रोकडे, देवीदासराव गायकवाड, रंगराज पुराणीक, बापू गायकवाड यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश महामुनी यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Tulajbhavani temple festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.