उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:02 AM2019-05-23T00:02:33+5:302019-05-23T00:02:49+5:30
लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम असताना तापमानाच्या वाढलेल्या पाºयामुळे अवघे शहरही तापले आहे. शहरात सलग दुसºया दिवशी बुधवारी (दि.२२) तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहिला. आठवडाभरापासून सूर्यनारायण ऐन भरात असून, उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम असताना तापमानाच्या वाढलेल्या पाºयामुळे अवघे शहरही तापले आहे. शहरात सलग दुसºया दिवशी बुधवारी (दि.२२) तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहिला. आठवडाभरापासून सूर्यनारायण ऐन भरात असून, उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.
चिकलठाणा वेधशाळेत बुधवारी कमाल तापमान ४२ अंश, तर किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. तापमानाचा पारा मंगळवारी ४२.६ अंशांवर गेला होता. तापमानात किंचित घट झाली. मात्र, उकाडा आणि उन्हाचा चटका कायम आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४३ अंशांवर जाईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रणरणत्या उन्हामुळे पारा अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असल्याने ऊन तापण्यापूर्वीच कामे आवरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारी एक ते चारपर्यंत रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर कर्फ्यूसारखी परिस्थिती पाहायला मिळाली. रस्त्यावर एखाद दुसरे वाहन नजरेस पडत होते.
रस्ते, भिंती गरम
उन्हाच्या कडाक्यामुळे सायंकाळनंतरही रस्ते, निवासस्थान विशेषत: घराच्या भिंती, स्लॅब गरम राहत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवत असून, पंखा, कूलरचा वापर करण्याशिवाय पर्यायच नाही.
------------