सर्वोपचारमधील व्हेंटिलेटर पुन्हा बंद; रूग्णांची गैरसोय
By Admin | Published: October 25, 2015 11:49 PM2015-10-25T23:49:28+5:302015-10-26T00:01:40+5:30
लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात १६ रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे़ यामध्ये ९ व्हेंटिलेटर सुरु होते़
लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात १६ रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे़ यामध्ये ९ व्हेंटिलेटर सुरु होते़ मागील दोन महिन्यांपासून ७ व्हेंटिलेटर बंद पडले होते़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने दखल घेऊन तात्पुर्ती उपाय योजनेअंतर्गत अन्य विभागातून २ व्हेंटिलेटर मागवून घेतले होते़ अद्यापही ४ व्हेंटीलेटर बंद आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना खाजगी रूग्णालयात जावे लागत आहे़
रूग्णालयातील अद्यापही काही शस्त्रक्रियागृहातील आॅपरेशन टेबलवरचे दिवे बंदच आहेत़ काही शस्त्रक्रिया गृहात वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे़ एमआरआय मशिन तिसऱ्यांदा सद्य:स्थितीतही बंद अवस्थेतच आहे़ अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर मागील दोन महिन्यांपासून बंद होते़ प्रशासनाने अन्य विभागातील व्हेंटिलेटर आणून व्हेंटिलेटरमध्ये भर घातली़ पण तरिही सतत सुरु असणारे व्हेंटिलेटर जुनेच असल्याने वारंवार बंद पडत आहेत़ ९ व्हेंटीलेटर असलेल्या अतिदक्षता विभागात अद्यापही ४ व्हेंटीलेटर बंद असून, केवळ ५ व्हेंटीलेटवरच रूग्णांना सेवा मिळत आहे़ मात्र गंभीर रूग्ण आल्यास व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून खाजगी रूग्णालयाकडे पाठविली जात आहे़ यामुळे रूग्णांची परवड होत आहे़