कर्जमाफीसाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:58 PM2017-08-14T23:58:15+5:302017-08-14T23:58:15+5:30

शेतकºयांना कुठलीही अट न लावता आजपर्यंत थकीत व सरसगट कर्ज माफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला.

Turnover for debt waiver | कर्जमाफीसाठी चक्काजाम

कर्जमाफीसाठी चक्काजाम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतकºयांना कुठलीही अट न लावता आजपर्यंत थकीत व सरसगट कर्ज माफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलकांना अटक करण्यात आली तर काही ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनात शेतकºयांसह विविध संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला. कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वत्र कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोमवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील पूस, धायगुडा पिंपळा, गिरवली या मुख्य रस्त्यावर शेतकºयांनी बैलगाड्या रस्त्यावर लावून चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. अंबाजोगाई-गिरवली-पूस या रस्त्यावर तालुक्यातील शेतकºयांनी बैलगाडया मुख्य रस्त्यावर लावून चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे अंबाजोगाई तालुक्यात या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, बबन आपेट, पटेल यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माजलगाव शहरातील शिवाजी चौकात पहिले आंदोलन सुकाणु समितीच्यावतीने करण्यात आले. या ठिकाणी सकाळी आंदोलन सुरु झाले. त्यावेळी आंदोलनात अनेकजण सामिल झाले होते. जवळपास एक तास हे आंदोलन चालल्यानंतर तहसीलदार एन.जी. जंपलवाड यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परभणी टी. पॉर्इंट येथे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याठिकाणी परभणी, माजलगाव आणि तेलगावकडुन येणाºया वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. रस्त्यावर बैलगाडया आडव्या लावुन हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी जवळपास दीड तास वाहतुकीचा खोळंबा झालेला पहावयास मिळाला. तसेच घोषणाबाजी देखील करण्यात आली. छोटीवाडी, तालखेड फाटा येथेही आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात मोठया प्रमाणावर शेतकरी तथा विविध संघटनांचे पदाधिकारी सामिल झाले होते. प्रचंड घोषणाबाजीने शासनाच्या कर्जमाफी विरोधात शेतकºयांनी आवाज उठवला. तालखेड फाटा येथील आंदोलनात सुमारे दीड तास राष्ट्रीय महामार्ग क्र .२२२ हा बंद राहिल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन
बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात प्रा. सुशीला मोराळे, कुलदीप करपे, मोहन लांब, राजाभाऊ देशमुख, ज्योतीराम हुरकुडे, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, गणेश मस्के, संगमेश्वर आंधळकर, पंकज चव्हाण, आशा कांबळे आदी सहभागी होते.

Web Title: Turnover for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.