बीडमधील एटीएम फोडून पळविले १२ लाख

By Admin | Published: November 4, 2015 12:08 AM2015-11-04T00:08:25+5:302015-11-04T00:25:07+5:30

बीड: शहरातील अंबिका चौकापासून जवळ असलेल्या पोस्टमन कॉलनी परिसरातील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून

Twelve million of the bead was thrown out of Beed | बीडमधील एटीएम फोडून पळविले १२ लाख

बीडमधील एटीएम फोडून पळविले १२ लाख

googlenewsNext


बीड: शहरातील अंबिका चौकापासून जवळ असलेल्या पोस्टमन कॉलनी परिसरातील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १२ लाख ३३ हजार ८०० रुपये पळवून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून तपासासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.
राम सोन्नर यांच्या मालकीच्या असलेल्या गाळ्यात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्री काही चोरटे एटीएममध्ये घुसले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमचा खालचा भाग कापला. त्यात पैसे असलेला बॉक्स चोरट्यांनी काढून नेला. अधीक्षक अनिल पारसकर, उपविभागीय अधिकारी गणेश गावडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सी.डी. शेवगण, शिवाजीनगर ठाण्याचे सपोनि ए.एच.जगताप यांनी भेट दिली.
तीन पथके रवाना
चोरट्यांचा शोधार्थ तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. सांयकाळपर्यंत कोणताही संशयीत ताब्यात घेण्यात आला नसल्याचे सपोनि ए.एच. जगताप यांनी सांगितले.
चार ते पाच जण असल्याचा संशय
बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मुख्य रस्त्यावर असल्याने एटीएममध्ये चोरी करताना दोघे किंवा तिघे मध्ये असतील व इतर दोघे बाहेर पाळत ठेवत असली असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात येणार आहे.
एटीएमला सुरक्षारक्षकच नाही
एटीएममध्ये लाखो रुपये लोड केली जातात. मात्र एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नसतो. ही बाब ‘लोकमत’ने गेल्या वर्षी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणली होती. एटीएममध्ये चोरी होण्याची शक्यताही व्यक्त केली होती. हा अंदाज वर्षभराने खरा ठरता. पोस्टमन कॉलनी परिसरातील एटीएमवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. त्यामुळे ही चोरी सहजरित्या चोरट्यांना करता आली. (प्रतिनिधी)

Web Title: Twelve million of the bead was thrown out of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.