आठवडाभरात दोनशे कोटी
By Admin | Published: May 10, 2016 12:38 AM2016-05-10T00:38:50+5:302016-05-10T00:58:00+5:30
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनापोटी बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांना आठवडाभरात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाईल,
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनापोटी बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांना आठवडाभरात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, अशी माहिती ‘डीएमआयसी’चे सरव्यवस्थापक गजानन पाटील, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी येथे दिली.
‘डीएमआयसी’ अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीसाठी (आॅरिक) बिडकीन परिसरातील ३,३०० हेक्टर जमिनीचे आतापर्यंत संपादन करण्यात आले आहे. चार गावांतील आणखी ८७५ हेक्टर जमीन येत्या दोन महिन्यांत ताब्यात घेतली जाईल. या जमिनीच्या संपादनापोटी शेतकऱ्यांना ५२० कोटी रुपये दिले जातील.पहिल्या टप्प्यात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाणार असून, आठवडाभरात ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.बिडकीनच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सिंगापूर, कॅनडासारख्या देशातील चार संस्थांनी सल्लागार म्हणून काम करण्याची तयारी दाखविली आहे. येत्या १५ दिवसांत सल्लागाराची नियुक्ती केली जाईल.