अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

By Admin | Published: May 28, 2014 11:51 PM2014-05-28T23:51:33+5:302014-05-29T00:39:32+5:30

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे.

Twenty-five tankers for 25 lakh villagers | अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

googlenewsNext

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. यामुळे तब्बल सव्वादोन लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी होते. उन्हाळा सुरू होताच या विहिरी सांगळ्यावर आल्या होत्या. आता उन्हाळा अधिक तीव्र झाल्याने विहिरींसह कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०६ गावे व १७२ वाड्यांवरील २ लाख २१ हजार ६६० ग्रामस्थांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टॅँकर २० आहेत, तर खाजगी टॅँकर १०४ आहेत. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी या टॅँकरच्या दररोज २९८ खेपा करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात दीड लाख ग्रामस्थांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या आठवड्यात पाणीटंचार्ई अधिक झाल्याने टॅँकरच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात ग्रामस्थांना नळयोजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने तेथे अद्याप एकही टॅँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर, आष्टी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरसह प्रशासनाकडून विहीर, कूपनलिकाही अधिग्रहित करण्यात येत आहेत. १०७ गावे व ८७ वाड्यांवरील मिळून ८३ विहिरी व १५८ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वा वाडी-वस्तीवर पाणीटंचाई आहे, तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीमधून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. यावर तात्काळ दखल घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ज्या ठिकाणी टॅँकरची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ टॅँकर सुरू करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका लोकसंख्या गावे वाडी टॅँकर खेपा बीड ५०८५७ ३५ १४ ३४ ७४ गेवराई ८१९२ ०३ ०१ ०३ ०८ शिरूर ७५०० ०२ ०८ ११ ०६ पाटोदा ११०८९ ०८ ०२ ०९ १९ आष्टी १०००७७ ५१ ३६ ६१ १५१ केज ३६४४२ ०४ ०४ ०६ २० परळी १२०० ०१ ०१ ०१ ०४ धारूर ६३०३ ०२ ०६ ०४ ११

Web Title: Twenty-five tankers for 25 lakh villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.