कॉपीसाठी अडीच लाखांचे बनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:05 AM2017-08-15T00:05:14+5:302017-08-15T00:05:14+5:30

: नगरपालिका पदभरती परीक्षेत पकडण्यात आलेल्या सहा हॉयटेक कॉपीबहाद्दरांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,

Twenty two lakhs for copy | कॉपीसाठी अडीच लाखांचे बनियन

कॉपीसाठी अडीच लाखांचे बनियन

googlenewsNext

जालना : नगरपालिका पदभरती परीक्षेत पकडण्यात आलेल्या सहा हॉयटेक कॉपीबहाद्दरांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर एका अल्पवयीन संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या सहा परीक्षार्थींनी अंगात घातलेल्या बनियनची किंमत अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
जालना, अंबड, परतूर व भोकरदन पालिकेच्या विविध ३३ पदांसाठी रविवारी ११ केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जेईएस महाविद्यालयाच्या केंद्रावर लिपीक टंकलेखक पदाचा पेपर देणाºया सहा संशयितांना भरारी पथकाने मोबाईल डिव्हाईसच्या आधारे हायटेक कॉपी करताना पकडले होते, तर सीटीएमके शाळेत एका अल्पवयीन उमेदवाराला दुसºयाच्या नावावर परीक्षा देताना ताब्यात घेण्यात आले. संशयित कृष्णा साहेबराव भवर (राजाटाकळी, औरंगाबाद), कृष्णा रमेश दांडगे (हाळदा, सिल्लोड) , निहालसिंग महाजन सुंदर्डे (शेवगा, फुलंब्री) प्रदीप बदामसिंग सुलाने (तळणी, भोकरदन), प्रदीप हरिओम घुसिंगे (कौचलवाडी, अंबड) विक्रम धरमसिंग जरवाल (कचनेरतांडा) व बुलडाणा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.
डिव्हाईसचा चटका बसल्याने भंडाफोड
जेईएस केंद्रात परीक्षा सुरू असताना एका परीक्षार्थीला बनियनच्या आतून बसविलेल्या इलेक्ट्रानिक डिव्हाईसचा चटका बसू लागला. त्यामुळे त्याची चूळबूळ सुरू होती. ही बाब भरारी पथकाच्या लक्षात आली अन् हायटेक कॉपीचा भंडाफोड झाला.

Web Title: Twenty two lakhs for copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.