वीस बहुराष्ट्रीय उद्योग ‘आॅरिक’मध्ये येण्यास उत्सुक
By Admin | Published: May 10, 2016 12:47 AM2016-05-10T00:47:56+5:302016-05-10T01:04:02+5:30
औरंगाबाद : वीस बहुराष्ट्रीय उद्योगांनी औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची (आॅरिक) आतापर्यंत पाहणी केली आहे. यापैकी एका मोठ्या उद्योग समूहास येत्या सप्टेंबरमध्ये पहिल्या भूखंडाचे वाटप केले जाईल,
औरंगाबाद : वीस बहुराष्ट्रीय उद्योगांनी औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची (आॅरिक) आतापर्यंत पाहणी केली आहे. यापैकी एका मोठ्या उद्योग समूहास येत्या सप्टेंबरमध्ये पहिल्या भूखंडाचे वाटप केले जाईल, असे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे (डीएमआयसी) सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
‘डीएमआयसी’ अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या ‘आॅरिक’मधील पायाभूत सुविधांची कामे शेंद्रा परिसरात वेगाने सुरू आहेत. या कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक (पान २ वर)
शेंद्रा परिसरातील २५० एकर क्षेत्रात ‘लँडस्केपिंग’ची कामे केली जातील. या अंतर्गत पाझर तलावांचे सुशोभीकरण, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ व झाडे फुलविण्यात येतील.
४खुल्या भूखंडांवर बगिच्यांची कामे जातील. या कामांसाठी सल्लागार नियुक्तीची निविदा महिनाअखेरीस प्रसिद्ध केली जाईल. 1
पाणी उपलब्धता हा ‘डीएमआयसी’समोर मोठा प्रश्न होता. औरंगाबाद शहरातून दररोज १३१ एमएलडी सांडपाणी सोडले जाते. यापैकी एक कोटी लिटर म्हणजेच शंभर ‘एमएलडी’ सांडपाणी नक्षत्रवाडी प्रकल्पात शुद्ध केले जाईल. 2
प्रक्रिया केलेले पाणी पिण्याच्या दर्जाचे असेल; परंतु उद्योगांना वापरासाठी ते उपलब्ध करून दिले जाईल. २०० कोटींच्या या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करावयाची असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. जूनअखेरपर्यंत सल्लागार नियुक्त केला जाईल, अशा प्रकारे ‘डीएमआयसी’चा पाणी प्रश्न सोडविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.