गुंतवणुकीचे आमिष देऊन शिक्षकाचे सव्वा दोन लाख परस्पर हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:05 AM2021-06-03T04:05:57+5:302021-06-03T04:05:57+5:30
येवला तालुक्यातील आडसुरेगाव येथील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर उलपे हे वैजापूर येथील विद्यानगरात राहतात. ...
येवला तालुक्यातील आडसुरेगाव येथील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर उलपे हे वैजापूर येथील विद्यानगरात राहतात. त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एंजेल ब्रोकिंग शेअर मार्केट हे ॲप मोबाइलवर डाऊनलोड केले होते. या ॲपच्या माध्यमातून एक महिन्यापासून ते गुंतवणूक करीत होते. त्यांनी यात मोठी रक्कम गुंतवणूक केली. मात्र खात्री करण्यासाठी त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर काॅल आला. कस्टमर केअरमधून बोलते, असे सांगून त्यांनी उलपे यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे उलपे यांना संशय आला. त्यांनी जवळच्या एटीएमवर जाऊन खात्यावरील रक्कम तपासली. तेव्हा दोन लाख पंचवीस हजार रुपये पसस्पर काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. वैजापूर पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.