अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:02 AM2021-06-02T04:02:16+5:302021-06-02T04:02:16+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या दोनशेखाली आली. दिवसभरात फक्त १५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६७, ...

Two-and-a-half months later, Corona's death in single digits | अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात

अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या दोनशेखाली आली. दिवसभरात फक्त १५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६७, तर ग्रामीण भागातील ९० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडाही दहाखाली गेला असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात १६ मार्च रोजी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दररोज दुहेरी संख्येत मृत्युसत्र सुरू होते. अखेर अडीच महिन्यांनंतर हा आकडा एकेरीत आला आहे. त्याबरोबरच आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही शंभरखाली आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ८८९ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १३६ आणि ग्रामीण भागातील २७२, अशा ४०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना सावरगाव, कन्नड येथील ५२ वर्षीय पुरुष, राजनगर, पैठण येथील ७२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ३८ वर्षीय पुरुष, गाेलटगाव, शेकटा येथील ३० वर्षीय पुरुष, शिरोड खुर्द, फुलंब्रीतील ७० वर्षीय महिला, एसटी काॅलनीतील ८२ वर्षीय पुरुष, शहरातील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सातारा परिसर २, बीड बायपास २, गारखेडा १, शिवाजीनगर २, कांचनवाडी २, अजबनगर १, मिटमिटा १, पेठेनगर १, एन-१२ येथे १, एन-५ येथे २, हर्सूल ३, संत ज्ञानेश्वरनगर १, आंबेडकरनगर १, चेतनानगर २, सारा वैभव १, सुरेवाडी १, विश्रांतीनगर १, संभाजी कॉलनी १, एन-४ येथे १, पुंडलिकनगर १, इंदिरानगर १, माऊलीनगर १, सातारा पोलीस स्टेशनमागे १, जवाहर कॉलनी १, निसर्ग कॉलनी, भीमनगर २, तथागत चौक, बन्सीलालनगर २, द्वारकानगर पडेगाव १, गुलमंडी १, संजयनगर २, मेल्ट्रॉन एमआयडीसी २, अन्य २५.

ग्रामीण भागातील रुग्ण

वाळूज एमआयडीसी १, नावडी ता.कन्नड १, रांजणगाव १, भराडी ता. सिल्लोड २, फुलंब्री १, लासूर स्टेशन ता.गंगापूर १, हट्टी ता.सिल्लोड १, अन्य ८२.

Web Title: Two-and-a-half months later, Corona's death in single digits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.