शेंदुरवादा येथील अडीच टन भेंडी युराेपात निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:05 AM2021-03-06T04:05:16+5:302021-03-06T04:05:16+5:30
औरंगाबाद : शेंदुरवादा (ता. गंगापूर) येथील समृद्ध शेतकरी गटाने केलेल्या करार पद्धतीच्या शेतीतून पिकवलेल्या गुणवत्तेच्या भेंडीची निर्यात युरोपात होत ...
औरंगाबाद : शेंदुरवादा (ता. गंगापूर) येथील समृद्ध शेतकरी गटाने केलेल्या करार पद्धतीच्या शेतीतून पिकवलेल्या गुणवत्तेच्या भेंडीची निर्यात युरोपात होत आहे. निर्यातीचा शुभारंभ शुक्रवारी कृषी विभाग व ‘आत्मा’च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित झाला, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.
‘आत्मा’अंतर्गत २०१७ मध्ये स्थापन केलेल्या शेंदूरवादा येथील समृद्ध शेतकरी गटाने के. बी. एक्स्पोर्ट, फलटण या कंपनीसोबत केलेल्या करारनुसार भेंडी निर्यातीला सुरुवात केली. डॉ. मोटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक वैशाली कुलकर्णी, उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक बिनगे, कृषी पर्यवेक्षक श्रीकृष्ण बंडगर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे, भगवान लघाने, समृद्ध शेतकरी गटाचे अध्यक्ष आनंद निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अडीच टन भेंडी या करारांअंतर्गत निर्यात केली जाणार आहे.